सुशील भोईर,वसई
हिरकणी कक्षाचे आज जागतिक महिला दिनी उदघाटन,
वसई तहसीलदार कार्यालयात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिरकणी कक्षाचे उदघाटन करण्यात आले. तहसीलदार,प्रांत,कोर्ट, पंचायत समिती कार्यालय असून महिला मोठ्या प्रमाणात शासकीय कामानिमित्ताने येत असतात.परंतु लहान मुलांना घेऊन आलेल्या स्ननदा मातांना बाळाला दुध पाजण्यासाठी आडोसा शोधावा लागतो.महिलांची ही अडचण लोकशाही महिला संघटनेच्या लक्षात आली.महिला संघटनेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वसई तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी यांच्याकडे या विषयी सतत पाठपुरावा करत होते.अनेक आंदोलन व मोर्चे सुध्दा या विषयावर काढण्यात आले.अखेर लोकशाही महिला संघटनेच्या लढ्याला यश मिळाले.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काही शासकीय कामानिमित्ताने आलेल्या गायत्री अनंता ठाकरे व त्यांचे बाळ शिवमई वय १३ महिने यांच्या हस्ते या हिरकणी कक्षाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी लोकशाही महिला संघटनेच्या सचिव व माजी नगरसेविका काॅ.मथुरा भोईर
भामाले लाल बावटा पक्षाच्या सहसचिव काॅम्रेड अरुणा मुकणे,पवित्रा थापड,भारती गुजर,पार्वती पाडेकर,अनिशा वाघ यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

