संजय लांडगे,वाडा
वाडा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा,
चैतन्य संस्था प्रेरीत सुयोदय ग्रामीण महिला संघ शिवणसई यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील अंबरभुई ( भोवरे पाडा ) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनासंबंधी ग्रामीण महिलांना व बचत गटाच्या महिलांना जिल्हा देखरेख आधिकारी राजश्री तरसे यांनी मार्गदर्शन करुन आजच्या दिवसाचे महत्व सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच महिलांसाठी चैतन्य संस्था कशी कार्यरत आहे, याविषयी माहिती देवून संस्था महिलाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अर्थसहाय्य करते यावर सविस्तर विवेचन केले.तसेच आपल्या मुलांना शिक्षण देवून मोठे करा,असे आवाहन केले.त्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम होवून, बचत गट अध्यक्ष,सचिव, सदस्य यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला,यावेळी सूर्योदय संघाच्या कर्मचारी स्वप्ना साखलतोडे,राजश्री माळी उपस्थित होत्या.

