वसंत भोईर, वाडा
ग्रामपंचायत खानिवलीची महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड,
ग्रामपंचायत खानिवलीच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात येत असुन महिलांच्या रोजगार,व्यावसायिक प्रशिक्षणे,आरोग्य तपासणी,शिक्षण या विषयांवर भर देण्यात येत आहे.रोजगार हमीच्या कामांवर महिलांना १०० % प्राधान्य देण्यात आले आहे.अनेक व्यवसायभिमुख प्रशिक्षणे महिलांना देण्यात आली आहेत.या सर्वांचा एकत्रित परिणाम की केंद्र शासनाच्या पंचायत विकास निर्देशांकमध्ये देशातील साडे सातशे ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत.या मध्ये ग्रामपंचायत खानिवली ची निवड झाली असुन पालघर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे.
महाराष्ट्रातील ३४ ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत.
आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये गावातील महिला ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,महिला डॉक्टर,स्टाफ नर्स,बचत गटाच्या प्रभाग संघाच्या अध्यक्षा,सचिव,सीआरपी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांना महिला स्नेही गावाची संकल्पना आणि प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी प्रेरणा पोटींदा,सारिका पाटील,निकिता वाघ या ग्रामपंचायत सदस्य,सलोनी पाटील,सुविधा पाटील,सुलभा पाटील अंगणवाडी सेविका तर विशाखा पाटील,साक्षी पवार या आशा सेविका,तसेच ज्योत्स्ना गोतारने,कामिनी पष्टे,रुत्ता पाटील स्टाफ नर्स,पालसई प्रभाग संघाच्या अध्यक्षा तृषा पष्टे,सचिव संध्या पाटील,स्वाती पाटील सीआरपी,स्नेहा भरत पाटील महाराष्ट्र पोलिस यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी यशदाच्या माध्यमातून सूर्यकांत गवले सल्लागार एनआयआरडी हैद्राबाद यांनी प्रशिक्षण दिले.यावेळी श्रमिक सहाय्यता एवं संदर्भ केंद्राच्या समन्वयक रुपाली पवार,पंचायत समिती आरजीएसए विभागाचे लहारे भाऊसाहेब व वाडेकर भाऊसाहेब उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी केले तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन सरपंच भरत हजारे यांनी केले.

