Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा वाड्यात राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम, राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानिवली,प्रा.आ. केंद्र गोऱ्हे,प्रा.आ.केंद्र परळी, प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. यंदा राष्ट्रीय डेंगू दिन ” तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंगूला हरविण्याचे उपाय करा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा. आ.केंद्र खानिवली अंतर्गत गावात डेंगू जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या वेळी डेंगू,चिकनगुनिया,पाणी साठे स्वछता,साथ रोग व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देण्यात आली.तसेच कोरडा दिवस पाळण्या संदर्भात…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा पं.स.च्या तांत्रिक सहा.ला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले, वाडा पंचायत समिती रोजगार हमी योजनेचे तांत्रिक सहा.सुशील कटारे याला ५ लाखाचा निधी मंजूर करण्यासाठी ५ हजाराची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.या प्रकाराने पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीरीकरिता ५ लाखांचा निधी मंजूर करण्यासाठी पंचायत समिती वाडा यांच्याकडे अर्ज केला होता.ही विहीर मंजूर करण्यासाठी तांत्रिक सहा.व वरिष्ठांसाठी १५ हजार रू.ची मागणी केली होती.तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार काल तक्रारदार यांना पंचासोबत पडताळणीसाठी पाठवले असता,स्वत:साठी ५ हजार व…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण भागात मान्सूनच्या तोंडावर घराची दुरुस्ती व डागडुजीला सुरुवात… नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील जनतेची पार दाणादाण उडवून दिली आहे.परवा रात्री झालेली अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात सुमारे शंभरहून अधिक घरांची पडझड झाली.या बाधित घरांची महसूल विभागाकडून सध्या पाहणी करण्यात येत असून या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला पाठवण्यात येणार आहे. मात्र अचानक कोसळलेल्या या संकटामुळे स्थानिक भूमिपुत्र मात्र कोलमडून पडला आहे.जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होत असते.परंतु यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मे महिन्यातच अतिवृष्टीला सामोरे जावे लागले.अवकाळी पाऊस जर इतका धुवांधार पडतो तर यंदाचा पावसाळा हा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता गृहीत…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार बँकेचा ” सॅफ,” ला बाय बाय… दहा वर्षांपूर्वी अनियंत्रित कर्जांमुळे ( एन.पी.ए. ) आर्थिक अडचणीत सापडलेल्या जव्हार अर्बन बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये ‘सॅफ’ ( सुपरवायजरी ॲक्शन फ्रेमवर्क ) अंतर्गत वर्गीकृत केले होते.त्यामुळे बँकेवर अनेक निर्बंध लादलण्यात आले होते.विद्यमान संचालक मंडळाने प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल करून नवीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे अल्पावधीत बँकेचा एन.पी.ए. ३६ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आले.त्यामुळे बँकेचा नफा वाढला व बँकेच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा झाली. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने ‘अ’ श्रेणीचे ऑडिट रेटिंग प्राप्त केले.बँकेच्या विद्यमान संचालक मंडळ आणि प्रशासनाने केवळ दोन वर्षांत केलेल्या या प्रभावी कामगिरीची दखल घेत,…

Read More

दीपक मोहिते, मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा… देशात मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा असून हे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एका अहवालातून समोर आले आहे.१ हजार मुलांमागे ८४३ मुली,असे हे प्रमाण असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.गेल्या पंचवीस वर्षात मुलीच्या जन्मदराने इतका नीचांक कधीच गाठला नव्हता.सदर बाब सामाजिक चिंता वाढवणारी आहे.या अशा स्थितीमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात,अशी विदारक परिस्थिती देशाच्या शहरी व ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.त्यामुळे याप्रश्नी प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याची गरज आहे.तसेच या विषयी असलेले कायदे अधिक कडक व्हायला हवेत. केंद्र व राज्य सरकार मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना राबवत असते,पण त्यास लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे.”…

Read More

दीपक मोहिते, ” भीषण वास्तव, ” विकास प्रक्रियेत आदिवासी समाज कुठाय ? तो आजही जगतोय उपेक्षित जीवन… राज्यात असंख्य नद्या वाहतात,भुगर्भात पाण्याचा साठाही विपुल प्रमाणात आहे,तरीही आपले राज्य हे पाण्याच्या बाबतीत कायम टंचाईग्रस्त आहे.वर्षानुवर्षे ही स्थिती कायम आहे.अनेक सरकारे आली व गेली,परंतु जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागू शकले नाहीत.जल,जमीन व जंगलचा राजा,म्हणून ओळख असलेल्या आदिवासी समाजातील निरक्षरतेचा फायदा घेत धनदांड़ग्यानी प्रचंड लूट केली.या लुटमारीमध्ये राज्यकर्त्यांनीही आपले हात धुवून घेतले.आदिवासी समाजाचे कैवारी म्हणून ज्यानी त्यांच्या हक्कासाठी लढ़े दिले.त्यांच्याही तलवारी आता हळूहळू म्यान होत चालल्या आहेत.मायबाप सरकार,एकीकडे आदिवासीच्या विकासाचा ढोल वाजवते,तर दुसरीकडे त्याच समाजाच्या कोट्यवधी रु.च्या जमिनी खरेदी करता याव्यात,यासाठी पाठच्या दाराने…

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान, विक्रमगड तालुक्यात काल रात्री वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक घरांचे प्रचंड नुकसान केले.तसेच आंबा व काजू पिकांचीही मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात विजेचा पत्ता नाही. विक्रमगड तालुक्यात काल रात्रीपासुन वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक घरावरील शेडस व पञे उडाल्याच्या घटना घडल्या. अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे काल रात्रीपासुन तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्ते व विजेच्या तारांवर पडलेली झाडे काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात येत आहे. विक्रमगड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी होत असुन जनजीवन पार विस्कळित झाले आहे.काल झालेल्या अतिवृष्टीमध्ये यशवंतनगर येथील…

Read More

दीपक मोहिते, बी.आर.गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश, न्ययव्यवस्थेतील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले बी.आर. गवई यांची देशाचे ५२ वे सरन्यायधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी काल देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.संजीव खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्राचे सुपत्र आहेत. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीश या पदावर कार्यरत असतील. न्यायमूर्ती गवई हे मुळचे अमरावतीचे आहेत.त्यांनी ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात विविध पदावर काम केले.१७ जाने.२००० पासून त्यांनी सरकारी वकील…

Read More

नवीन पाटील,सफाळे जलसार – नारंगी रो-रो सेवेमुळे नवजात बालकाचे वाचले प्राण… अचानकपणे प्रकृती खालावलेल्या एका नवजात बाळासाठी जलसार – नारंगी दरम्यान सुरू करण्यात आलेली रो-रो सेवा एका बालकाला जीवदान देणारी ठरली आहे.सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेला दोन दिवसापूर्वी बाळ झाले.मात्र नवजात बाळाला श्वसनाचा त्रास सुरू झाला.त्याला रुग्णवाहिकेने विरारपर्यंत नेणे शक्य नव्हते.अखेर रो-रो व्यवस्थापनाकडे विनंती केल्यानंतर रात्रीच्या वेळी रो-रो सेवेतून रुग्णवाहिका नारिंगीपर्यंत नेण्यात आली.त्या बाळाला तातडीने उपचार मिळाले व या नवजात बालकाचे प्राण वाचले.त्यामुळे या भागासाठी ही रो-रो सेवा अति महत्त्वाची व सोयीची ठरत असल्याचे स्पष्ट झाले. विराथन खुर्द येथील रहिवासी असलेल्या अस्मिता जाधव यांना प्रसूती वेदना…

Read More

दीपक मोहिते, ” वास्तव,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; लवकर होण्याची शक्यता फार कमी… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या चार महिन्यात जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.पण सरकार यामध्ये काहीतरी खुसपटे काढून निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाला जाहीर करू देईल,अशी शक्यता वाटत नाही.त्यामुळे या निवडणुका लवकर होतील, असे वाटत नाही. सद्याची परिस्थिती महायुती सरकारमधील तीनही घटक पक्षांना पोषक असली तरी त्यांचा एकंदरीत कल पाहता सरकार निवडणूक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू देईल,असे वाटत नाही.स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्रशासकीय राजवट,ही सत्तेत असलेल्या पक्षांना फायदेशीर ठरत असते.या निवडणुका जेवढ्या लांबणीवर पडतील,तेवढा त्यांना त्या फायदेशीर ठरत असतात.त्यामुळे सरकार कोणाला तरी न्यायालयाच्या या…

Read More