सचिन पाटील,विरार
विवा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती स्पर्धांचे आयोजन,
विवा महाविद्यालय मिरा – भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्तालय आणि बोळींज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ‘तसेच ‘ नशा मुक्ती भारत ‘ या उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अँटी ड्रग स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे,सहा.पोलीस निरीक्षक जयचंद्र ठाकूर,सहा.पोलीस उपनिरीक्षक दीपक निकम, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे इ.मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी ” जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ” म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत संकल्पनेवर रील बनवणे,गीत स्पर्धा, पोस्टर बनवणे,समूह नृत्य,इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या विनाशकारी परिणामांबाबत माहिती देणे,असा होता.
या स्पर्धांमध्ये विविध शाखांतील २०० हून अधिक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. “ नशा मुक्त भारत,” “औषध नव्हे विष,” “ जगण्यासाठी नाही तर संपण्यासाठी आहे नशा,” अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादरीकरण केले. पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कलात्मकतेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व संस्थेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अनुश्री किणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या समितीचे सर्व सदस्य,एनएसएस युनिट, करिअर संसदेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

