वसंत भोईर,वाडा
रायकर पाडा येथील विद्यार्थी तराफ्यातून प्रवास करत गाठतात शाळा,
तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रायकर पाडा हे वीस घरांचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तराफ्याच्या सहाय्याने वैतरणा नदीतून प्रवास करून सोनाळे गावातील शाळा गाठावी लागते.वारा,पाऊस व नदीच्या पाण्यात ओले कपडे वह्या, पुस्तकांची पार अवस्था होत असते.अशा परिस्थितीत डोक्यावर भितीची टांगती तलवार असतानाही हे विद्यार्थी जिद्दीने प्रवास करत शाळा गाठत असतात.
गायकर पाडा या गावातील १५ विद्यार्थी सोनाला हायस्कूल,२ विद्यार्थी जि.प.शाळा कापरी,एक विद्यार्थी वाडा कॉलेज अशा एकूण १८ विद्यर्थ्यांना दररोज रोज शिक्षणासाठी हा प्रवास करावा लागततो.मात्र त्यासाठी पावसाळ्यात रुद्रावतार धारण करत असते.नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असा धोकादायक प्रवास विद्यार्थी करत असतात. विद्यार्थ्यांबरोबरच गरोदर माता,आबाळ वृद्ध,रुग्ण नागरिक यांचीही गैरसोय होत असून त्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुळाबाळांची होणारी गैरसोय दूर व्हावी,यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही आमची कोणी दादच घेत नाही. त्यामुळे आम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागत आहे.
– विनोद हाडळ,ग्रामस्थ

