- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” २० नोव्हें.रोजी मतदान तर निकाल २३ नोव्हें रोजी,राजकीय हालचालींना वेग, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.महाराष्ट्रात २० नोव्हे.रोजी मतदान होणार असून २३ नोव्हे.रोजी निकाल लागणार आहे.या निवडणुकीत सुमारे ९ कोटी ६३ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत.त्यापैकी ४ कोटी ९७ लाख पुरुष तर ४ कोटी ६६ लाख महिला मतदार आहेत.तसेच ५६ हजाराहून अधिक मतदार तृतीय पंथीय आहेत.या निवडणुकीत १ लाख १८६ मतदानकेंद्रे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टो.रोजी प्रसिद्ध होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टो.अशी आहे.३० ऑक्टो.रोजी…
दीपक मोहिते, बविआ पालघर मतदारसंघातील सहाही जागा लढवणार, आ.राजेश पाटील यांनी अफवांना लावला लगाम, बहुजन विकास आघाडी, पालघर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे.या निवडणुका बविआ महाविकास आघाडी व महायुती यापैकी कोणाशीही हातमिळवणी करणार नाही.या सर्व निवडणुका ते स्वबळावर लढवणार असल्याचे आज बविआतर्फे जाहीर करण्यात आले. आज बविआतर्फे विरार येथे पत्रकारांना निवडणूक विषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी बविआचे वरिष्ठ नेते माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक,व बोईसरचे आ.राजेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.या निवडणुकीत बविआची भूमिका कशी असेल,याविषयी आपली भूमिका त्यांनी विषद केली.यावेळी आ.राजेश पाटील यांनी आपल्या विषयी माध्यमावर ज्या अफवा पसरवण्यात येत आहेत,निराधार असून…
दिपक मोहिते, ” भयावह वास्तव,” देशात कुपोषण व उपासमारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ… ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यंदाच्या वार्षिक अहवालामध्ये आपल्या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट अशी असून १३.७ % जनता कुपोषित असल्याचे म्हंटले आहे.ही संस्था जगभरातील उपसमारीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत असते.चीन,नेपाळ,बंगला देश व श्रीलंका या देशापेक्षाही आपली स्थिती अत्यंत खालावली असल्याचे उघड झाले आहे.जगभरातील १२७ देशाच्या यादीत आपण १०५ व्या क्रमांकावर आहोत.त्यामुळे किती भयावह स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या देशात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ८० कोटी लोकांना फुकट जेवण देण्यात येत असल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात येत असतो.कोरोना काळापासून एका कुटुंबाला ३५ किलो अन्न धान्य ( गहू व तांदूळ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गद्दारी करण्यामागे सत्तेचा हव्यास,ईर्षा व स्वार्थ असतो.. शिवसेनेत झालेल्या बंडाला आता अडीच वर्षे पूर्ण होत आली आहे.२० जून २०२२ रोजी विधानपरिषदेची निवडणूक संपल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रीचेबल झाले,त्यानंतर ठाणे व्हाया सुरतमार्गे ते थेट गुवाहाटी व तेथून गोव्यात दाखल झाले.अशाप्रकारे गद्दारीचे एक वर्तुळ पूर्ण झाले.त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनीही गद्दारी करण्यात,” हम भी कुछ कम नही,” दाखवून दिले.राजकारणात अशाप्रकारची जी गद्दारी होते,ती रिकाम्या पोटी नाहीतर भरल्यापोटी होत असते.हा एक प्रकारचा भसम्या रोग असतो.अशा रोगाची लागण झालेल्या रुग्णाची भूक कधीच मिटत नाही. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी या दोघाना त्यांच्या राजकीय वाटचालीत काय दिले…
दिपक मोहिते, सूर्यातीर, विकासाच्या नावाखाली सुरु असलेली वृक्षतोड व हवेतील प्रदूषण रोखा, दरवर्षी पडणारा अवकाळी पाऊस व माघारी फिरणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते.यंदाही परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र अविरतपणे सुरू आहे.मात्र सरकार अवकाळी व परतीचा पाऊस,या दोन ज्वलंत विषयावर संशोधन व उपाययोजना करण्याबाबत कायम उदासीन राहिले.दरवर्षी हमखास येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीच्या मुळाशी विस्कळीत पर्यावरण,हे एकमेव कारण आहे.भरमसाठ होणारी वृक्षकत्तल व जल/हवेतील प्रदूषण रोखण्याबाबत सरकार प्रचंड उदासीन असल्यामुळे निसर्गाचे ऋतुचक्र पार लयाला गेले आहे.त्याचे परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.या महिन्यात राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने…
दीपक मोहिते, वारे व्वा…. इशारे कोणाला देता ? आपल्या पायाखाली काय जळतय,ते पहा जरा.. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आश्चर्याचा धक्का बसला.हे दोघे आपल्या भाषणात जे काही म्हणाले,ते समोर जमलेल्या प्रचंड गर्दीला पाहून भारावून गेले असावेत,असे वाटते.पण त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकाना आश्रर्य वाटलेच,पण बऱ्यापैकी मनोरंजन देखील झाले. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा जरा, विरोधकांना टोला लगवताना ते म्हणाले,मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे,मी आनंद दिघेसाहेबांचा चेला आहे,मला हलक्यात घेऊ नका,मी मैदानातून पळणारा नाही,तर पळवणारा नाही.अहो शिंदेसाहेब,बंड करण्यापूर्वी तुमचा माणूस ईडीच्या भितीने कुठे गायब झाला होता ? तुम्ही देखील…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पुरोगामी राज्य राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पार रसातळाला गेले, दुसऱ्याचे घर फोडण्यात आघाडीवर असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना काल रात्री झालेल्या घटनेतून तरी शहाणपण येईल,अशी अपेक्षा आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली असताना आपले गृहमंत्री महाशय,हे तीन वर्षांपासून इतरांची घरे फोडण्याचे पाप करण्यात रममाण आहेत.लोकसभा निवडणुकीत आपटी खाल्यानंतरही फडणवीस यांचे डोके अद्याप ताळ्यावर आलेले नाही.बदलापूर बलात्कार,पुणे बलात्कार,पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रनच्या वाढत्या घटना,त्या घटनातील आरोपींना वाचवण्याचे झालेले प्रयत्न,महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,ओबीसी,मराठा व धनगर आरक्षण प्रकरणी त्यांच्याकडून होत असलेला ” अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग,महायुतीमधील अंतर्गत वाद,इ.कारणे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या दारुण पराभवाला कारणीभूत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे,गृहमंत्र्यांनी पायउतार व्हावे, काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेने कायदा-सुव्यवस्थेसोबत सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खालावली असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबई,पुणे व नागपूर या तीन शहरात गुंडगिरीने जो हैदोस घातला आहे,तो पाहता या शहरात आता कोणीही सुरक्षित नाही,हे स्पष्ट झाले आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.जे गृहखाते एका माजी राज्यमंत्र्याचे संरक्षण करू शकत नाही,त्या खात्याच्या प्रमुखपदी असलेल्या फडणवीस यांनी पायउतार व्हायला हवे,अशा मागणीने जोर धरला आहे. राज्याची राजधानी मुंबई,उपराजधानी नागपूर व सांस्कृतिक…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” नळावरचे भांडण, ” सुंठीवाचून खोकला,” जाण्याच्या प्रतिक्षेत देवेंद्र फडणवीस, शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या मार्गात अजित पवार यांचा खोडा, मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक नळावर जस महिलांचे पाण्यासाठी भांडण होत असते,तसेच या बैठकीत पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधून विस्तव जात नाही.अशावेळी अजित पवार यांनी अचानकपणे ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने,” चे ” माझी लाडकी बहीण,” असे नामकरण केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारा चढला व मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत ” तीन पैश्याचा तमाशा,” सुरू झाला.नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वप्नातला ” अलिबाग-विरार कॉरिडॉर,” प्रकल्पाचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सयाजी शिंदे यांना अशी उपरती का व्हावी ? आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग क्षेत्र गाठलेल्या व्यक्ती आपल्या जीवनात अनेकदा अक्षम्य चुका करत असतात,क्षणिक फायद्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल,हे त्यांच्या यशस्वी करकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते.काल अशीच एक घटना घडली.सिनेसृष्टीमध्ये प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख असलेले सयाजी शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.त्यांना अशी उपरती का झाली ? हे न समजणाऱ्या कोड्यासारखे आहे.प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोघेही ” पाणी,” व ” शेतकाऱ्यांच्या आत्महत्या,” या अत्यंत जिव्हाळ्याच्या दोन विषयावर त्यांच्या ” नाम,” संस्थेच्या माध्यमातून प्रचंड काम करत आहेत.पण त्यांनी कधीही राजकीय पक्षाची वाट धरली नाही.उलट…
