दीपक मोहिते,
बविआ पालघर मतदारसंघातील सहाही जागा लढवणार,
आ.राजेश पाटील यांनी अफवांना लावला लगाम,
बहुजन विकास आघाडी, पालघर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे.या निवडणुका बविआ महाविकास आघाडी व महायुती यापैकी कोणाशीही हातमिळवणी करणार नाही.या सर्व निवडणुका ते स्वबळावर लढवणार असल्याचे आज बविआतर्फे जाहीर करण्यात आले.
आज बविआतर्फे विरार येथे पत्रकारांना निवडणूक विषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी बविआचे वरिष्ठ नेते माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक,व बोईसरचे आ.राजेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.या निवडणुकीत बविआची भूमिका कशी असेल,याविषयी आपली भूमिका त्यांनी विषद केली.यावेळी आ.राजेश पाटील यांनी आपल्या विषयी माध्यमावर ज्या अफवा पसरवण्यात येत आहेत,निराधार असून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही.मी,आ.हितेंद्र ठाकूर यांचे बोट धरून राजकारणात आलो.गेल्या २५ वर्षात आ.हितेंद्र ठाकूर यांनी मला भरभरून दिले आहे.त्यामुळे मरेपर्यंत त्यांच्यासोबतच असेन.तरी लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांना आता ब्रेक बसला आहे.
आ.हितेंद्र ठाकूर यांनी प्रथमच जिल्ह्यातील सहाही विधानसभा जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.

