- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा समर्थनचे अध्यक्ष डॉ.अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थ मंडळावर नियुक्ती, अर्थसंकल्पावर काम करणाऱ्या समर्थन संस्थेचे अध्यक्ष अँड. ( डॉ. ) अशोक येंडे यांची,सर्वोच्च न्यायालयाच्या विधी व सेवा समितीच्या अधीन असलेल्या मध्यस्थी केंद्राच्या पॅनलवर मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी व सेवा समितीचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायमूर्तीद्वारे त्यांची नियुक्ती झाली आहे.एका संवेदनशील आणि वंचित घटकांच्या वेदनांची जाणीव असणाऱ्या व्यक्तीची ही नियुक्ती असून न्यायप्रक्रियेत अन्यायग्रस्त दुर्बल घटकाचे योग्य प्रतिनिधित्व डॉ.अशोक येंडे करतील,असे गौरोद्वागार समर्थन आणि श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्य स्तरीय आढावा समिती अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) विवेक पंडित यांनी काढले, व डॉ.अशोक येंडे यांचे…
दीपक मोहिते, स्वयंतक पाटील याने अर्नाळा ते वसई अंतर पोहून करून केले पार, महाराष्ट्र साहसी क्रीडा प्रकारातील खाडी पोहणे,या क्रीडा प्रकाराचा महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात समावेश केलेला आहे.या क्रीडा प्रकारांतर्गत शिवछत्रपतींच्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून,उमेळमानचा कुमार स्वयंतक पंकज पाटील याने आज अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे सुमारे २२ कि.मी. अंतर पोहून पार केले आहे. ” महाराष्ट्र स्टेट ॲमेचर एक्वेटिक असोसिएशन,” च्या देखरेखीखाली हा साहसी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जलतरणाची सुरुवात पहाटे ७.००वाजता अर्नाळा किल्ला येथून झाली,तर शेवट दुपारी १ वाजून. २५ मिनिटांनी वसई किल्ला येथे झाला. त्याने हे अंतर अवघ्या ६ तास २१ मिनिटांमध्ये पार केले.यावेळी…
अनंत भोईर,पालघर पालघर येथे भव्य ” जय शिवाजी जय भारत,” पदयात्रेतून शिवजयंती उत्साहात साजरी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये भव्य ” जय शिवाजी जय भारत पदयात्रा,” काढण्यात आली.ही पदयात्रा तहसील कार्यालय,पालघर येथून जिल्हाधिकारी कार्यालय,पालघरपर्यंत निघालेल्या या भव्य पदयात्रेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,तहसीलदार सचिन भालेराव,शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) संगीता भागवत तसेच अधिकारी,कर्मचारी, सामाजिक संस्था,शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. या पदयात्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा…
सुरेश वैद्य सफाळे, जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी, आज जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवाजी शहाजी भोसले ( १९ फेब्रुवारी, १६३० – ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध,हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.इ.स.१६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरी केला जातो. अशा…
शुभम सावंत,विरार महानगरपालिकातर्फे आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग, ” जय शिवाजी जय भारत, ” च्या जयघोषाने संपूर्ण वसई शहरात आज जल्लोषाचे वातावरण होते.निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचे… वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी वसईतील हुतात्मा बाळा सावंत स्मारक ते नरवीर चिमाजी आप्पा स्मारक,वसई किल्ला या मार्गावर ” जय शिवाजी जय भारत,” या सुमारे साडेपाच कि.मी.पदयात्रेचे आयोजन केले होते.या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक,पदाधिकारी, विद्यार्थी,अधिकारी कर्मचारी,पोलिस विभाग व विविध कला सादर करणारे पथके सहभागी झाली होती. वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित व आयुक्त अनिलकुमार पवार यांचे शुभहस्ते हुतात्मा…
अनंत भोईर, पालघर, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जनता दरबाराचे आयोजन, वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या २० फेब्रु.रोजी जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात आले आहे. उद्या २० फेब्रु.रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजल्यापासून विविध विभागाच्या टेबलावर नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणीचा निपटारा करू शकणार आहेत.यावेळी नागरिकांनी आपली निवेदने तीन प्रतीमध्ये सादर करण्याची गरज आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषद घेऊन जनता दरबाराविषयी सविस्तर माहिती दिली होती. नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी विविध विभागाच्या २० टेबलांची व्यवस्था जिल्हाधिकारी…
शुभांगी शिंदे, नाशिक, राज्यात आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांचा संप सुरू, महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सीटुच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये आज पासून आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला असुन सीआयटीयु भवन खुटवड नगर सातपूर येथे या संपाबाबत व आरोग्य मित्रांच्या व्यथा जाणून घेउन मागण्या शासन दरबारी पोहोचवणे कामी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल. कराड यांनी २६ हजार रु. वेतन मिळावे.दरवर्षी १०% टक्के इन्क्रिमेंट करावे सर्व कामगारांना ग्रॅच्युटी लागू करावी,अशा मागण्या शासनाकडे केल्याचे सांगितले. तसेच कॉ रमेश बैसाणे व कॉ गणेश शिंदे यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे,अशी आग्रही केली. या पत्रकार परिषदेला…
संजय लांडगे,वाडा, वाड्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी, वाडा तालुक्यातील शिरीष पाडा येथे युनिक फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाड्यातील एड्यूस्मार्ट डिजिटल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर करत शिवस्मारक स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केली. Pकार्यक्रमात एड्यूस्मार्ट शाळेच्या पियुष भडांगे याने जोशपूर्ण शिवपोवाडा सादर केला,तर छत्रपती शिवाजी महाराज स्कूलच्या दुर्वा गोळे, हिमांशू गोतारणे,आर्य जाधव आणि विघ्नेश वेखंडे यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेरणादायी भाषणे दिली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचा गौरव करत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य भक्ती ताई वलटे,सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी,कल्पेश मोकाशी,युनिक फाऊंडेशन अध्यक्ष ऋषिकेश सावंत, माजी अध्यक्ष डॉ.भाई…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपचा डोळा,आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या स्वबळावर लढण्याची मागणी,भाजपचे खासदार,आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.त्यादृष्टीने पक्षाचे वरिष्ठ नेतेही अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहे.पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे प्रसिद्धीमाध्यमाना सांगितले.पण त्यांच्या या वक्तव्याला कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही.कारण पक्षातील सर्व घटकाचा कल हा आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याकडे आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी एकमेकांशी समझौता करून निवडणुका लढवल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात तिकिटे देता येणार नाही,हे लक्षात घेऊन भाजपचे वरिष्ठ नेते पक्षातून होणाऱ्या स्वबळाच्या मागणीचा विचार करतील,अशी शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात विशेष करून…
सुहास शेरेकर,नवी मुंबई, भाजपची ठाणे व कोक विभागाची कार्यशाळा संपन्न, भाजपा महाराष्ट्र प्रदेश आयोजित संघटन पर्व ठाणे आणि कोकण विभागीय कार्यशाळा,महसूल मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे पार पडली.याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. ” राष्ट्र प्रथम,” या ध्येयाने प्रेरित प्रत्येक कार्यकर्त्यांना नवे संकल्प देणारी आणि विकासाची दिशा ठरवणारी ही कार्यशाळा कार्यकर्त्यांना अधिक ऊर्जा देणारी ठरली.पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने काम करावे,बूथ स्तरापासून पक्षवाढीसाठी कटिबद्ध रहावे, असा महत्वपूर्ण संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.यावेळी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील विस्तार योजनांवर मंथन करण्यात आले.भाजपाचा विचार घरोघरी…
