सुहास शेरेकर,नवी मुंबई,
भाजपची ठाणे व कोक विभागाची कार्यशाळा संपन्न,
भाजपा महाराष्ट्र प्रदेश आयोजित संघटन पर्व ठाणे आणि कोकण विभागीय कार्यशाळा,महसूल मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख
उपस्थितीत नवी मुंबई येथे पार पडली.याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
” राष्ट्र प्रथम,” या ध्येयाने प्रेरित प्रत्येक कार्यकर्त्यांना नवे संकल्प देणारी आणि विकासाची दिशा ठरवणारी ही कार्यशाळा कार्यकर्त्यांना अधिक ऊर्जा देणारी ठरली.पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने काम करावे,बूथ स्तरापासून पक्षवाढीसाठी कटिबद्ध रहावे, असा महत्वपूर्ण संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.यावेळी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील विस्तार योजनांवर मंथन करण्यात आले.भाजपाचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता अधिक जोमाने कार्यरत राहील,असा विश्वास,या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेत राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश,वनमंत्री गणेश नाईक,खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,खा.धैर्यशील पाटील,प्रदेश महासचिव आ. विक्रांत पाटील,प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक,प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी आदी मान्यवरांसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

