अनंत भोईर, पालघर,
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जनता दरबाराचे आयोजन,
वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या २० फेब्रु.रोजी जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात आले आहे.

उद्या २० फेब्रु.रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजल्यापासून विविध विभागाच्या टेबलावर नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणीचा निपटारा करू शकणार आहेत.यावेळी नागरिकांनी आपली निवेदने तीन प्रतीमध्ये सादर करण्याची गरज आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषद घेऊन जनता दरबाराविषयी सविस्तर माहिती दिली होती.
नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी विविध विभागाच्या २० टेबलांची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर,येथे करण्यात आली आहे.
यापूर्वी झालेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. उद्या होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडून आपल्या त्याचे निराकारण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

