सुरेश वैद्य सफाळे,
जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी,
आज जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शिवाजी शहाजी भोसले ( १९ फेब्रुवारी, १६३० – ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध,हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.इ.स.१६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरी केला जातो.
अशा थोर महापुरुषाची जयंती आज जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल उपस्थित त्यांना विस्तृत माहिती दिली.
यावेळी शिक्षणाधिकारी ( योजना ) शेषराव बडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा राजेश पाध्ये, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.
शशिकांत साळुंखे,जिल्हा कृषी अधिकारी,तसेच
जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

