शुभांगी शिंदे, नाशिक,
राज्यात आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांचा संप सुरू,
महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सीटुच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये आज पासून आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला असुन सीआयटीयु भवन खुटवड नगर सातपूर येथे या संपाबाबत व आरोग्य मित्रांच्या व्यथा जाणून घेउन मागण्या शासन दरबारी पोहोचवणे कामी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल. कराड यांनी २६ हजार रु. वेतन मिळावे.दरवर्षी १०% टक्के इन्क्रिमेंट करावे सर्व कामगारांना ग्रॅच्युटी लागू करावी,अशा मागण्या शासनाकडे केल्याचे सांगितले.
तसेच कॉ रमेश बैसाणे व कॉ गणेश शिंदे यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे,अशी आग्रही केली.
या पत्रकार परिषदेला आरोग्य मित्र संघटनेचे पदाधिकारी कॉ. गणेश शिंदे,कॉ.तुषार चौधरी, कॉ.सुवर्णा सपाईत,कॉ ज्योती कापसे,कॉ.दीपक तिरमले,कॉ. नीलम आव्हाड,सीटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ.देविदास आडोळे व आरोग्य मित्र कर्मचारी उपस्थित होते.

