संजय लांडगे,वाडा,
वाड्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी,
वाडा तालुक्यातील शिरीष पाडा येथे युनिक फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाड्यातील एड्यूस्मार्ट डिजिटल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर करत शिवस्मारक स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केली.

Pकार्यक्रमात एड्यूस्मार्ट शाळेच्या पियुष भडांगे याने जोशपूर्ण शिवपोवाडा सादर केला,तर छत्रपती शिवाजी महाराज स्कूलच्या दुर्वा गोळे, हिमांशू गोतारणे,आर्य जाधव आणि विघ्नेश वेखंडे यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेरणादायी भाषणे दिली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचा गौरव करत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य भक्ती ताई वलटे,सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी,कल्पेश मोकाशी,युनिक फाऊंडेशन अध्यक्ष ऋषिकेश सावंत, माजी अध्यक्ष डॉ.भाई वलटे, राजेश पाटील तसेच युनिक फाऊंडेशनचे प्रमोद ठाकरे, अजित ठाकरे, सुरेश पाटील, सूरज ठाकरे,रोहिदास पाटील, स्वप्निल पाटील,कौशल पाटील,नीलेश ठाकरे,सागर अधिकारी यांसह परिसरातील अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

