दीपक मोहिते,
स्वयंतक पाटील याने अर्नाळा ते वसई अंतर पोहून करून केले पार,
महाराष्ट्र साहसी क्रीडा प्रकारातील खाडी पोहणे,या क्रीडा प्रकाराचा महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात समावेश केलेला आहे.या क्रीडा प्रकारांतर्गत शिवछत्रपतींच्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून,उमेळमानचा कुमार स्वयंतक पंकज पाटील याने आज अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे सुमारे २२ कि.मी. अंतर पोहून पार केले आहे. ” महाराष्ट्र स्टेट ॲमेचर एक्वेटिक असोसिएशन,” च्या देखरेखीखाली हा साहसी उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

जलतरणाची सुरुवात पहाटे ७.००वाजता अर्नाळा किल्ला येथून झाली,तर शेवट दुपारी १ वाजून. २५ मिनिटांनी वसई किल्ला येथे झाला. त्याने हे अंतर अवघ्या ६ तास २१ मिनिटांमध्ये पार केले.यावेळी ” महाराष्ट्र स्टेट ॲमेचर एक्वेटिक असोसिएशन, “या संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. आठ वर्ष वय असलेला छोटा स्वयंतक आगरी समाज विकास शिक्षण संस्थेच्या शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. स्वयंतकला प्रशिक्षक राकेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्याला अगदी लहानपणापासूनच पोहोण्याची आवड निर्माण झाल्याचे प्राध्यापिका असलेल्या त्याची आई डॉ. लतिका पंकज पाटील यांनी सांगितले.या साहसी व रोमांचक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी,तसेच त्यास प्रोत्साहन व आशीर्वाद देण्यासाठी जलतरणप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

