- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, शिट्टी या निवडणूक चिन्हासाठी बविआ मुंबई उच्च न्यायालयात, केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे निवडणूक चिन्ह जनता दल ( युनायटेड ) पक्षासाठी राखीव ठेवल्यामुळे बहुजन विकास आघाडीसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे.त्यामुळे बविआने उच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगा विरोधात दाद मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील न्यायालयामध्ये न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्यासमोर आज सकाळी बहुजन विकास आघाडीने भारत निवडणूक आयोग व इतरांच्या विरुद्ध जनहित याचिका ( रिट पिटीशन ) दाखल केली आहे.यावेळी प्रतिवादी यांना याचिकेचा तपशील पुरवण्याविषयी सुचित करण्यात आले आहे.याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. २० नोव्हें.रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय खेळीकडे तमाम राजकीय पक्षाचे लक्ष, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकारणाला लवकरच वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.बहुजन विकास आघाडीने सहा विधानसभा मतदारसंघात उभे केल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघात उभे असलेले कॉम्रेड आ.विनोद निकोले व विक्रमगड येथे उभे असलेले सुनील भुसारा हे दोघेही आ.हितेंद्र ठाकूर यांचे जिवलग मित्र असतानाही त्यांच्यासमोर आ.ठाकूर यांनी उमेदवार उभे केल्यामुळे आ.ठाकूर यांच्या मनात नेमके काय चालले आहे ? याविषयी पालघर जिल्ह्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. तसेच १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात देखील आ.हितेंद्र ठाकूर वेगळी खेळी खेळण्याच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, डहाणू येथे भाजप तर विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) यांची डाळ शिजणे कठीण, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी १२८ डहाणू वगळता इतर पाच ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाली आहे. १२८ डहाणू विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.विनोद निकोले यांच्या विरोधात भाजपचे विनोद मेढा रिंगणात उतरले आहेत.ही जागा बहुजन विकास आघाडीने लढवायचे ठरवल्यास अरुण निकोले हे त्यांचे उमेदवार असतील.या जागेवर मनसेने विजय वाढीया यांना उमेदवारी दिली आहे.मात्र या मतदारसंघात मार्क्स.कम्यु.व भाजप वगळता इतर पक्षाची ताकद नगण्य आहे.त्यामुळे विनोद मेढा व विनोद निकोले या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” या निवडणुकीत मनसे महायुतीची ” बी,” टीम, मनसेचे राजे,राज ठाकरे हे सतत भूमिका बदलणारे नेते म्हणून ओळखले जातात.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला व मुंबई,ठाणे,नाशिक व पुणे या चार महानगरात युतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.त्यावेळी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते.पण त्यांचा तो पाठिंबा बिनशर्त नव्हता,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला जाणवू लागले आहे.त्यांनी या निवडणुकीत सुमारे १५० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.त्यापैकी किती जागा निवडून येतील,हे सांगणे अवघड आहे.पण त्यांनी काल मनसे सत्तेत येईल व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील,असे भाकीत केले पण त्यांचे हे भाकीत खरे ठरण्याची शक्यता…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई-नालासोपारा शिवसेना ( उबाठा ) फुटीच्या मार्गावर, पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे.हे दोन्ही मतदारसंघ जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्यामुळे आपल्या हातून गेल्याचा आरोप शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.काल अनेक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन हे आरोप केले.आज सकाळी जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले. २०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने लढवले होते.यावेळी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले.जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व सेनेचे वरिष्ठ नेते व माजी खा.विनायक राऊत या दोघांनी संगनमत करून हे दोन्ही मतदारसंघ घालवले,असे माजी जिल्हाध्यक्ष…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” १३० पालघर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता, १३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उबाठा )शिवसेना ( शिंदे गट ) व बविआ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.या विधानसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.माजी खा.राजेंद्र गावित यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या ४ नोव्हें.रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.शिवसेना ( उबाठा ) तर्फे जयेंद्र किसन दुबळा तर राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून रिंगणात आहेत.बहुजन विकास आघाडीही या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.त्यांच्याकडून माजी आ.अमित घोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.त्यांना उमेदवारी मिळाल्यास…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बारामतीकर,या निवडणुकीत धरणात **** लावणार… काल पुरोगामी,सुशिक्षित व सांस्कृतिक,चेहरा असलेल्या फुले,शाहू व आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात माणुसकीला काळे फासणारी घटना घडली.मेलेल्या माणसाविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही,पण अहंकाराचे गुलाबी जाकीट घातलेल्या व संस्कृतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या अजित पवार यांनी स्व.आर.आर.पाटील,यांच्यावर तोंडसुख घेतले व उभा महाराष्ट्र हळहळला.आपल्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागत असल्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.युगेंद्र पवार यांची पहिलीच जाहीर सभा,न भूतो,न भविष्यती अशी झाल्यामुळे अजित पवार यांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या व उर्मटपणा ठायी ठायी भिनलेल्या अजित पवार यांनी साधनशुचिता गुंडाळून ठेवत आपल्या…
दीपक मोहिते, वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघात बविआ हमखास बाजी मारणार, १३१ बोईसर (अनु.ज.) १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात आजपासून प्रचाराला सुरुवात होत आहे.या तिन्ही मतदारसंघात विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये असलेली नाराजी व रुसवा इ.कारणामुळे महायुती व महाविकास आघाडी पुर्णतः जर्जर झाली आहे.त्यांच्या अधिकृत उमेदवारांसमोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.आघाडी व युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरील पक्षाची स्थिती लक्षात न घेता,घेतलेले निर्णय पक्षाच्या चांगलेच अंगलट आले आहेत.या दोघांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात सामिल होतील,असे वाटत नाही.ही स्थिती लक्षात घेता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.वसई येथे विद्यमान आ.हितेंद्र ठाकूर…
दीपक मोहिते, मनोज पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे संघाचे पदाधिकारी नाराज, भाजपचे मनोज पाटील व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समीर वर्तक हे दोघेही वसई व नालासोपारा मतदारसंघातून इच्छुक होते.पण त्यांना डावलून वसई येथे भाजपने स्नेहा दुबे व काँग्रेसने संदीप पांडेय या दोघाना उमेदवारी दिली.त्यामुळे या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.त्यांच्या या नाराजीचा फटका उभय पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे. मनोज पाटील हे संघाच्या मुशीतून वरपर्यंत पोहोचलेले नेते असून त्यांनी वसई तालुक्याच्या नागरी समस्यांवर आंदोलने,मोर्चे,आदी कार्यक्रम राबवले.तसेच आपल्याला वसई मतदारसंघातून उमेदवारी मिळावी,म्हणून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले.पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
दीपक मोहिते, सहा विधानसभा मतदारसंघात एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची प्रचंड दमछाक झाली. आज एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. कालपर्यंत १२८ डहाणू- ०८,१२९ विक्रमगड-१६,१३० पालघर,-१२,१३१ बोईसर-११,१३२ नालासोपारा-१२ व १३३ वसई-२७,असे एकूण जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.उमेदवार अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान आ.विनोद निकोले,आ.सुनील भुसारा,आ.राजेश पाटील,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,यांचा समावेश आहे.या सहापैकी जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) या पक्षांच्या नाराजांचा त्यामध्ये समावेश आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी माजी…
