दीपक मोहिते,
वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघात बविआ हमखास बाजी मारणार,
१३१ बोईसर (अनु.ज.) १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात आजपासून प्रचाराला सुरुवात होत आहे.या तिन्ही मतदारसंघात विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये असलेली नाराजी व रुसवा इ.कारणामुळे महायुती व महाविकास आघाडी पुर्णतः जर्जर झाली आहे.त्यांच्या अधिकृत उमेदवारांसमोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.आघाडी व युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरील पक्षाची स्थिती लक्षात न घेता,घेतलेले निर्णय पक्षाच्या चांगलेच अंगलट आले आहेत.या दोघांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात सामिल होतील,असे वाटत नाही.ही स्थिती लक्षात घेता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.वसई येथे विद्यमान आ.हितेंद्र ठाकूर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील,नालासोपारा येथे विद्यमान आ.क्षितिज ठाकूर,भाजपचे उमेदवार राजन नाईक व बोईसर येथे विद्यमान आ.राजेश पाटील व भाजपचे विलास तरे यांच्यामध्ये सरळ लढत होईल.या तिन्ही मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पुन्हा बाजी मारेल,असे वाटते., या तिन्ही मतदारसंघात विरोधी पक्षांच्या उमेदवारांची पाटी कोरी आहे,तर दुसरीकडे बविआचे उमेदवार मात्र केलेल्या विकासकामांची जंत्री घेऊन मतदारांच्या समोर जातील.त्यामुळे मतदार यावेळीही बहुजन विकास आघाडीला भरभरून पाठिंबा देतील. विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार हा प्रामुख्याने आ.ठाकूर यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यावर राहील.असा हा नकारात्मक प्रचार या तिन्ही मतदारसंघातील मतदारांच्या आजवर कधीही पचनी पडला नाही,तसाच तो यंदाही पडणार नाही.त्यामुळे या तिन्ही निवडणुका एकतर्फी होतील,असा अंदाज आहे.या निवडणुकीत
७ : ४ : २ असेच सूत्र राहणार आहे.( आ.हितेंद्र ठाकूर सातव्यांदा,आ.क्षितिज ठाकूर चौथ्यांदा व आ.राजेश पाटील दुसऱ्यांदा बाजी मारतील )
अन्य काही उमेदवार रिंगणात असले तरी त्यांचा या निवडणुकीत फारसा प्रभाव नसेल.

