दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसई-नालासोपारा शिवसेना ( उबाठा ) फुटीच्या मार्गावर,
पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे.हे दोन्ही मतदारसंघ जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्यामुळे आपल्या हातून गेल्याचा आरोप शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.काल अनेक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन हे आरोप केले.आज सकाळी जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले.
२०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने लढवले होते.यावेळी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले.जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व सेनेचे वरिष्ठ नेते व माजी खा.विनायक राऊत या दोघांनी संगनमत करून हे दोन्ही मतदारसंघ घालवले,असे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष चव्हाण यांनी केला आहे.यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद खानोलकर,विनायक निकम,राजाराम बाबर व असंख्य पदाधिकारी होते.मात्र या आरोपांना उत्तर देताना,जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख म्हणाले,माझा या घडामोडीशी काडीमात्र संबंध नाही,हा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असून आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज पदाधिकाऱ्यांची लवकरत लवकर समजूत काढणार आहेत,असे माध्यमांना सांगितले.

