दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बारामतीकर,या निवडणुकीत धरणात **** लावणार…
काल पुरोगामी,सुशिक्षित व सांस्कृतिक,चेहरा असलेल्या फुले,शाहू व आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात माणुसकीला काळे फासणारी घटना घडली.मेलेल्या माणसाविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही,पण अहंकाराचे गुलाबी जाकीट घातलेल्या व संस्कृतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या अजित पवार यांनी स्व.आर.आर.पाटील,यांच्यावर तोंडसुख घेतले व उभा महाराष्ट्र हळहळला.आपल्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागत असल्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.युगेंद्र पवार यांची पहिलीच जाहीर सभा,न भूतो,न भविष्यती अशी झाल्यामुळे अजित पवार यांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या व उर्मटपणा ठायी ठायी भिनलेल्या अजित पवार यांनी साधनशुचिता गुंडाळून ठेवत आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला आहे.काल पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या तासगावात झालेल्या जाहीर सभेत बोलताना हे महाशय काय म्हणाले,ते पहा,ते म्हणाले,सिंचन घोटाळ्यासंदर्भात असलेल्या चौकशीच्या फाईलवर आबाने स्वाक्षरी करून माझा केसाने गळा कापला.फाईलवर आबांची स्वाक्षरी केल्याचे त्यांना त्यावेळी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले व ती फाईल अजित पवार यांना दाखवली.मुळात देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे.आणि समजा आबांनी स्वाक्षरी केली असेल तर त्यात चूक काय आहे ? तुम्ही ७० हजार कोटींचा सरकारी पैसा लुटता,आणि सरकारने ते उघड्या डोळ्याने पाहत राहायचे का ? त्यावेळी देवेंद्र फडणवीस व भाजपचे एकनाथ खडसे यांनी आमच्याकडे ७० हजार कोटी रु.च्या सिंचन घोटाळ्याचे ट्रकभर पुरावे असल्याचे भर जाहीर सभेत म्हंटले होते.ते देवेंद्र फडणवीस आज अजित पवार यांना जवळचे वाटतात.ईडीच्या भितीने आज त्याच फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत.ज्यांनी या अजित पवार यांना जेलची हवा खायला पाठवण्याची तयारी केली होती,त्या फडणवीस यांचे तळवे चाटण्यात हे महाशय आता धन्यता मानत आहेत.आबा हे यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक व शंकरराव चव्हाण यांच्या पंक्तीत बसणारे आदर्श व्यक्तिमत्व होते.त्यांना शरद पवार यांनी आपले राजकीय वारस मानले होते आणि हीच सल अजित पवार यांच्या मनात होती व त्यांनी आबांना अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.सिंचन घोटाळा प्रकरणी समजा आबांनी त्यांची चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली असेल तर चुकीचे काय केले ? महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशावर दरोडा घालणाऱ्यांची चौकशी करायची नाही तर ओवाळणी करायची का ?अजित पवार यांनी आबा सारख्या प्रामाणिक व सत्शील माणसांवर आरोप करून आपल्या गुलाबी जाकीटवर चिखल उडवून घेतला आहे.या निवडणुकीत त्याचे परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागणार आहेत.या निवडणुकीत बारामतीकर त्यांना धरणात **** लावतील यामध्ये तिळमात्र शंका नाही.

