दीपक मोहिते,
सहा विधानसभा मतदारसंघात एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल,
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची प्रचंड दमछाक झाली.
आज एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
कालपर्यंत १२८ डहाणू- ०८,१२९ विक्रमगड-१६,१३० पालघर,-१२,१३१ बोईसर-११,१३२ नालासोपारा-१२ व १३३ वसई-२७,असे एकूण जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.उमेदवार अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान आ.विनोद निकोले,आ.सुनील भुसारा,आ.राजेश पाटील,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,यांचा समावेश आहे.या सहापैकी जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) या पक्षांच्या नाराजांचा त्यामध्ये समावेश आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी माजी खा.राजेंद्र गावित याना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काल दिवसभर ते तणावाखाली होते.त्यानंतर ते घर सोडून निघून गेले,३० तास उलटुन गेल्यानंतरही पोलिसांना त्यांचा शोध लागू शकलेला नाही.त्यांचा अद्याप शोध न लागल्यामुळे सर्वत्र शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहेत.आ.वनगा हे काल सांयकाळी पत्रकारांशी बोलले,त्यानंतर त्यांनी आपले घर सोडले,त्यांचा मोबाईल सध्या नॉट रीचेबल असल्यामुळे आई व पत्नी प्रचंड तणावाखाली आल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी संपर्क करत आहेत,पण त्यांचा संपर्क होउ शकला नाही.शिवसेनेचे ( उबाठा ) नेते मिलिंद नार्वेकर हे देखील त्यांना संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत.
मतदारनिहाय किती उमेदवारी अर्ज दाखल झाले,याविषयीची माहिती :-
१२८- डहाणू विधानसभा मतदारसंघातून कल्पेश बाळू भावर (अपक्ष)
विनोद सुरेश मेढा (भारतीय जनता पार्टी)
आकाश प्रताप पटेल (अपक्ष)
विनोद भिवा निकोले (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), विनोद भिवा निकोले (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ),
अरुण शंकर निकोले (बहुजन विकास आघाडी), भसरा वसंत नवशा (अपक्ष)
विजय देवजी वाढीया (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
१२९-विक्रमगड (अ.ज.) विधानसभा मतदार संघातून आजीनाथ बाळू भावर (बहुजन समाज पार्टी), आजीनाथ बाळू भावर (बहुजन समाज पार्टी), रविंद्र विलास खुताडे (अपक्ष), भालचंद्र नवसु मोरघा(अपक्ष), प्रकाश कृष्णा निकम (अपक्ष), प्रविण भाऊ बोडके (अपक्ष), विलास बारकू मेढा (भारताचा क्रांतीकारी मार्क्सवादी पक्ष), शैलेश मावंजी हडबाळ (अपक्ष), भाऊ विष्णू बुधर (अपक्ष), नितीन लहानू हाडळ (अपक्ष), हरिशचंद्र सखाराम भोये (भारतीय जनता पार्टी), हरिशचंद्र सखाराम भोये (भारतीय जनता पार्टी), एकनाथ पांडू दरोडा (बहुजन विकास आघाडी), हेमंत सखाराम खुताडे (बहुजन विकास आघाडी), रमेश शंकर तुंबडा (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक), तुषार गंगाराम टोपले (अपक्ष)
१३०- पालघर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत उमापती देसक (बहुजन विकास आघाडी), मनोज भालचंद्र दांडेकर (अपक्ष), विजया राजकुमार म्हात्रे (अपक्ष), नम सुधीर शंकर (अपक्ष), राजेंद्र धेडया गावित (शिवसेना), जयेंद्र किसन दुबळा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), राजेंद्र धेडया गावित (शिवसेना), राजेंद्र धेडया गावित (शिवसेना), अशोक माधव भोईर (बहुजन विकास आघाडी), विजय रघुनाथ जाधव (अपक्ष), नरेश लक्ष्मण कोरडा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अमित कृष्णा घोडा (अपक्ष), गोपाळ राजाराम कोळी (लोकराज्य पार्टी)
१३१- बोईसर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातून पुष्पा प्रकाश धोडी (अपक्ष), विलास सुकूर तरे (शिवसेना), दिनकर दत्तात्रेय वाढाण (अपक्ष), राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी), राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी), प्रसाद सुरेश पऱ्हाड (बहुजन विकास आघाडी), अजिनाथ बाळू भावर (बहुजन समाज पार्टी), अजिनाथ बाळू भावर (बहुजन समाज पार्टी), जगदीश भगवान धोडी (अपक्ष), शैलेश दशरथ भुतकडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), शीतल संतोष गोवारी (वंचित बहुजन आघाडी),
१३२ नालासोपारा विधानसभा मतदार संघात पुढील प्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले
राजन बाळकृष्ण नाईक (भारतीय जनता पार्टी ) , बलराम सुभेदार ठाकूर (अपक्ष) , विनोद लालू पाटील ( अपक्ष ) , नरसिंग रमेश आदावळे (अपक्ष ) , कीर्ती राज भागवत लोखंडे ( अपक्ष ) , धनंजय विठ्ठल गावडे ( प्रहार जनशक्ती पक्ष ) , दिलीप दिगंबर गायकवाड ( अपक्ष ) , हरेश अंबो भगत ( अपक्ष ) , संदीप अमरनाथ पान्डेय ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) , सुरेश देवनाथ मोने ( बहुजन समाज पार्टी ) , सुचित सुरेश गायकवाड ( वंचित बहुजन आघाडी ) , बलराम सुबेदार ठाकूर ( अपक्ष ),
१३३- वसई विधानसभा मतदारसंघातून प्रल्हाद राणा (अपक्ष),
राजेंद्र अजित ढगे (अपक्ष),
हितेंद्र विष्णू ठाकूर (बहुजन विकास आघाडी),
हितेंद्र विष्णू ठाकूर (बहुजन विकास आघाडी),
प्रविणा हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी), प्रविणा हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी), प्रविणा हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी), हितेंद्र विष्णू ठाकूर (बहुजन विकास आघाडी), हितेंद्र विष्णू ठाकूर (बहुजन विकास आघाडी), राजकुमार शोभनाथ दुबे (अपक्ष),
विजय गोविंद पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विजय गोविंद पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विजय गोविंद पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुशांत श्रीकांत पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुशांत श्रीकांत पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), भावना अशोक पोकळे (प्रहार जनशक्ती)
स्नेहा प्रेमनाथ दुबे (भारतीय जनता पार्टी), स्नेहा प्रेमनाथ दुबे (भारतीय जनता पार्टी), प्रेमनाथ श्यामसुंदर दुबे (भारतीय जनता पार्टी), प्रेमनाथ श्यामसुंदर दुबे (भारतीय जनता पार्टी), गॉडफ्री जोसेफ आल्मेडा (अपक्ष), जिमी मतेस घोन्सालवीस
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद विश्राम तांबे (बहुजन समाज पार्टी),
विनायक श्रीधर निकम (अपक्ष), विनोद विश्राम तांबे (बहुजन समाज पार्टी),
हरिशंकर शेषनारायण जयस्वाल (राष्ट्रीय समाज पक्ष),
मंगेश भिमराव प्रधाने (अपक्ष)
१३३ वसई विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २७ तर सर्वात कमी ०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्यामुळे यंदा उमेदवारी अर्जाची संख्या वाढली आहे.या सहाही मतदारसंघातील लढतीचे चित्र ४ नोव्हे.रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

