Author: दीपक मोहिते

संजय नेवे,विक्रमगड शिक्षक समिती,विक्रमगड तालुकाध्यक्षपदी सुनील अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर यांची सभा नुकतीच आश्रमशाळा माण येथे पार पडली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर जिल्हाध्यक्ष राजू महाले यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली.या सभेत विक्रमगड शाखेच्या अध्यक्षपदी सुनील अधिकारी यांची तर सचिव पदी रविंद्र जायभाये व जिल्हा सदस्यपदी अजित भोईर यांची निवड करण्यात आली. सुनील अधिकारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड येथे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर संपन्न, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय विक्रमगडतर्फे पी.एम.किसान सन्मान योजना शिबिर उत्साहात संपन्न झाले. संत रोहिदास सभागृह,रोहिदास नगर, विक्रमगड येथे नुकतेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार व विक्रमगड पंचायत समिती गटविकास अधिकारी मिलिंद जगदाळे यांनी भेट दिली. या शिबिरात प्रलंबित ई-केवायसी,एनपीसीएल मॅपिंग,लँड सिडींग,वनपट्टेधारक व कातकरी समाज बांधव यांना लाभ,ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे,याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. येत्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे हप्ते मिळवण्याकरता ऍग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.

Read More

वसंत भोईर,वाडा अंभई/आमगाव ग्रामस्थांनी घातला पंचायत समिती कार्यालयाला घेराव, तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी गेल्या बुधवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सहाव्या दिवशीही या उपोषणाची दखल न घेतल्याने आज अंभई आमगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला. या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी वस्तूंची खरेदी करताना अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषण…

Read More

दीपक मोहिते, मागचा वाईट अनुभव, नदीजोड प्रकल्प : अर्थसंकल्पात ८८ हजार कोटी रु.ची आर्थिक तरतूद,फडणवीस/ विखे पाटील यांनी सावध राहण्याची गरज, अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्याची घोषणा केली आहे.या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रु. असून,त्याचा ३ लाख ७१ हजार २७७ हे.शेतजमिनीला फायदा होणार आहे.गेली अनेक वर्षे हा नदीजोड प्रकल्प धूळ खात पडला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.वाजपेयी यांनी त्यावेळी खा.सुरेश प्रभू यांना या योजनेच्या प्रमुखपदी नियुक्त केले होते.प्रभू यांनीही या योजनेचे काम धूमधडाक्यात सुरु केले होते. पण…

Read More

दीपक मोहिते, राज्यात होळी व धुलीवंदनाची जोरदार धूम, होळी व धुलीवंदन या दोन सणाची बाजारात धूम सुरू झाली आहे.पूजेचे साहित्य,विविध प्रकारचे रंग,पिचकारी इ.साहित्य खरेदीसाठी महिला व बाळगोपाळांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.हिंदू लोकांचा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.यंदाही तो त्याच पद्धतीने साजरा होणार आहे.होळी हा सण आपण का साजरा करतो,हा सण साजरा करण्यामागे कोणती पार्श्वभूमी आहे,हे सर्वप्रथम आपण जाणून घेणे गरजेचे आहे. पूर्वी हिरण्यकश्यपू हा एक राजा होता,तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा, आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही,अशी त्याला घमंड होती.पण गर्वाच घर नेहमी खाली असते,या न्यायानुसार या हिरण्यकश्यपू याने त्याचा मुलगा प्रल्हाद याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न…

Read More

अविनाश मढवी,नालासोपारा, मनपाच्या करवाढीविरोधात सेनेचा ( उबाठा ) आंदोलनाचा इशारा, वसई विरार शहर महानगरपालिकेने सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टीदरात २५ %, व निवासी आणि व्यवसायिक मालमत्ता करात ५ ते ७ % दरवाढ केली आहे.त्या संदर्भात विरोध करणारे निवेदन पालघर जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांच्या नेतृत्वाखाली वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्ताना देण्यात आले.येत्या पंधरा दिवसात ही दरवाढ अग्रक्रमाने रद्द करण्यात यावी,अन्यथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने वसई विरार शहर महानगरपलिका विरोधात ‘’ तीव्र निदर्शने,’’ करेल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर नाना पाटील,जिल्हा सचिव राजाराम बाबर,तालुकाप्रमुख वसई प्रथमेश राऊत,बोईसर तालुका प्रमुख काकासाहेब मोटे,उपतालुका…

Read More

वसंत भोईर,वाडा क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी घोणसई गावात प्रचारफेरी, केंद्र सरकारतर्फे क्षयरोग देशमुक्त अभियान राबवण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून आज घोणसई गावात कुडूस आरोग्य विभाग व घोणसई ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली. ” टिबी हरेल,देश जिंकेल, दोन आठवड्याचा खोकला डाॅक्टरांना भेटा,” आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी डाॅ.आफताब शेख यांनी क्षयरोगाविषयी माहिती नागरिकांना दिली. आरोग्य विभागाचे डाॅ.शिरीष खैरनार,डाॅ.तनुजा पाटील,आरोग्य सहा. गणेश गायकवाड,आरोग्य सेवक अविनाश शिंदे,घोणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जाबर,उपसरपंच विशाल पाटील,सदस्य दिलीप पाटील, ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ आदींसह विद्यार्थी प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लोकांना सेल्फी नकोत,प्रत्यक्षात काम हवंय, ” नेमेची येतो पावसाळा,” या उक्तीप्रमाणे यंदाही वसई-विरारकर नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करून निवडून आलेले नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी,या ज्वलंत समस्येबाबत मूग गिळून बसले आहे.वसई-विरार परिसरात सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा-२ अंतर्गत सुरू होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या अंथरण्याचे काम वेगाने सुरू आहे.या कामाची पाहणी करताना लोकप्रतिनिधीची छायाचित्रे दररोज पाहायला मिळतात,पण प्रत्यक्षात पाण्याचे काय ? ही पाहणी सुरू असताना बाजूने जाणारे पाण्याचे टँकर्स,हे या लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.केवळ जलवाहिन्या पाहून लोकांच्या घश्याची कोरड जाणार नाही.महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा शहरात आतापासून लोकांना टँकर्सचा आधार घ्यावा लागत आहे.तर ग्रामीण भागातील महिलाना डोक्यावर हंडे घेऊन…

Read More

मनिष म्हात्रे,वसई वस‌ईत जागतिक महिला दिनानिमीत्त बाईक रॅलीचे आयोजन, डी फॅक्टरी,रॉयल थम्स,डार्क हॉर्स मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वसईमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आज वसईत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार महानगरपालिका मुख्यालय विरार येथून चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला दरम्यान रॅली काढण्यात आली होती. सकाळी अनेक महिला व पुरुष रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते. सामाजीक कार्यकर्ते नितीन म्हात्रे आणि प्रीती म्हात्रे यांनी रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर सकाळी ८:०० वाजता रॅलीला सुरुवात झाली.वस‌ईतील धवल नितीन म्हात्रे या बाईक रायडर तरुणाने २०१२ साली महिलांच्या कर्तुत्वांना वाव मिळावा,यासाठी जागतीक महिला दिनी बाईक रॅली काढण्यास सुरुवात केली होती.करोना महामारीच्या काळात धवल याचा दुदैवाने मृत्यू…

Read More

सुरेश काटे,तलासरी, कवाडा शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला तिरपुडे,ज्येष्ठ शिक्षिका जेष्ठ गीता गुडपे यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये कवाडा गावच्या सरपंच दर्शना बोदले यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना स्व:रक्षणाचे महत्व,संस्कार कसे दिले जावे, हे जिजाऊ मातेचे उदाहरणं देऊन सांगितले. तसेच या दिवशी शालेय विद्यार्थींनीनी जागतिक स्तरावर पराक्रमी शूरवीर महिलांची भूमिका सादर केली.निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या माध्यमातून इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या मुलांसाठी माता-पालक…

Read More