नाशिक प्रतिनिधी,
नाशिक येथे गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आंदोलन,
दोन वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या कुंभमेळा स्थळी रामकुंडामध्ये बुडी मारून नाशिक महानगरपालिकेचा निषेध करीत आंदोलन केले.
त्र्यंबकेश्वरपासून नाशिकपर्यंत वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये अनेक ठिकाणी प्रदूषण,सांडपाणी व पानवेली यासारखे प्रश्न गंभीर असून गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याबाबत न्यायालयाने आदेश देऊन आणि पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलन इशारे देऊन देखील नाशिक महानगरपालिका गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याबाबत अपयशी ठरत असल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
आज पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात गोदावरी नदीमध्ये उड्या मारून महानगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. गोदावरीला आता पानवेलीचा विळखा पडला आहे,पानवेली काढण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नाशिक महानगरपालिकेने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धरणातून अनावश्यक पाणी सोडून पाण्याचा अपव्यय केल्याचा आणि आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

