दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी,५ पैकी ३ जागा जिंकल्या
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत महायुतीची चांगलीच पीछेहाट झाल्याचे लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांना त्यांच्या होम ग्राऊंडवर विरोधी पक्षांनी भुईसपाट केले. या निवडणुकीत मिळालेल्या यशाने विरोधी पक्षात सध्या आनंदाचे वातावरण आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजप, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्यामुळे पदवीधरांनी महायुतीला साफ नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाचही मतदारसंघांतील मतमोजणीला प्रचंड वेळ लागल्यामुळे उमेदवारांच्या जीवांची चांगलीच घालमेल झाली. ही मतमोजणी तब्बल ३६ तास सुरू होती. एकाही मतदारसंघात पहिल्या पसंतीची मते उमेदवाराना मिळाली नाहीत. त्यामुळे दुसर्या किंवा तिसर्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली. त्यामुळे मतपत्रिकांच्या आधारे झालेल्या या निवडणुकीततील मतमोजणीस बराच कालावधी लागला.
पदवीधरच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघांतून शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. तर नागपूर येथे अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी उत्तम कामगिरी केली.
हर्षदा जाधव-शिक्कामोर्तब; भाजपाच्या डॉ. स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव झाला.
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव या विजयी झाल्या. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवला.पुणे व मराठवाड्यातील मतदारांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला.हा कौल सर्वच राजकीय पक्षांना धक्का देणारा ठारला.
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांना पहिल्या पसंतीची १ लाख १२ हजार, तर भाजपच्या स्मिता जाधव यांना १ लाख ०२ हजार मते मिळाली. चुरशीच्या या निवडणुकीत देशमुख-जाधव यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती, पण त्यांना पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजय मिळवता आला नाही.या मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अरुण लाड हे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने चमकदार कामगिरी केली.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसने चुणूक दाखवली.त्यांच्या गटाचे प्रतापसिंह पाटील यांना ७४ हजार, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आ. सतीश चव्हाण यांना ६० हजार मतांवर समाधान मानावे लागले.सतीश चव्हाण हे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते. चौथ्या वेळी मात्र त्यांना विजयाने हूलकावणी दिली.
शिक्षक मतदारसंघात महायुतीला यश मिळाले.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे हे सात हजार मतांनी निवडून आले. गावडे यांना २० हजार ११८, शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिलेले सचिन सानप यांना १३ हजार ६४२, अपक्ष दत्तात्रय सावंत यांना १० हजार, तर काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना केवळ ८ हजार ६०० मते मिळाली. येथे महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले होते.या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळाली होती.महायुतीत जागावाटपात सहमती झाल्यावर चिवटे यांना माघार घेण्यास सांगण्यात आले होते. अमरावतीमध्ये अपक्ष सचिन सानप यांना शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला होता. कोल्हापूरच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाजपच्या गावडे यांनी विजय संपादन केला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक यांनी काँग्रेसच्या आदिती पोहरे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
निकाल खालीलप्रमाणे लागला,
विजयी उमेदवारांची यादी:
पदवीधर मतदारसंघ ( महाविकास आघाडी ३ जागा ):
• पुणे पदवीधर मतदारसंघ : हर्षदा देशमुख-जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट ) विजयी ( १,१३,०९५ मते ) — यांनी भाजपच्या स्मिता जाधव ( १,०२,७०४ मते ) यांचा पराभव केला.
नागपूर पदवीधर मतदारसंघ: अभिजित वंजारी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) विजयी ( ६३,६५० मते ) — यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे (६२,५४० मते) यांचा पराभव केला.
छत्रपती संभाजीनगर ( मराठवाडा ) पदवीधर मतदारसंघ : डॉ. प्रतापसिंह पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट ) विजयी ( ७४,०४३ मते ) — यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सतीश चव्हाण ( ६०,८७८ मते ) यांचा पराभव केला.
शिक्षक मतदारसंघ ( महायुती २ जागा ) :
,पुणे शिक्षक मतदारसंघ: कौस्तुभ गावडे ( भाजप ) विजयी ( २३,११७ मते ) — यांनी सचिन सानप ( १६,३४७ मते ) आणि जयंत आसगावकर ( ८,९६५ मते ) यांचा पराभव केला.
अमरावती शिक्षक मतदारसंघ : किरण सरनाईक ( शिवसेना – शिंदे गट ) विजयी ( १६,६६३ मते ) — यांनी काँग्रेसच्या आदिती पोहरे ( ८,६३६ मते ) यांचा पराभव केला.

