वसंत भोईर,वाडा
शंभर रु.त क्विंटलभर गहू
स्वच्छ ; थेट दळायला न्यायचं!
रब्बी हंगामात गहू काढण्यासाठी शेतकरी आता हार्वेस्टरचा वापर करू लागले आहेत.मजुरावर अवलंबून राहणे,कमी होऊन काढणी प्रक्रिया जलद होऊ लागली आहे.पूर्वी गव्हाची काढणी मजुरांच्या मदतीने करण्यात येत असे.पण आता हार्वेस्टरमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे.
गहू फिल्टर करणाऱ्या यंत्रणेचा वापर केला,तर गहू काढणीनंतर गव्हात असणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९९ टक्के कमी होते.गहू चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. गहू स्वच्छ झाल्यानंतर थेट दळायला नेता येतो.
गहू फिल्टर करण्यासाठीचा दर एका पोत्यामध्ये १२० रु.आहे.हार्वेस्टरच्या वापरामुळे गहू पिकाची काढणी कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक करता येते. साधारणपणे अर्ध्या तासात एका क्षेत्रातील गहू पिकाची काढणी अवघ्या पंधराशे रु.त होते.
हार्वेस्टरने गहू काढल्यानंतर गव्हात मोठ्या प्रमाणात,खडे, माती व काचोळ्यांचे प्रमाण असते.मशीनद्वारे गहू काढल्यानंतर गव्हात मोठ्या प्रमाणात खडे मातीचे प्रमाण असतेच.
हार्वेस्टरने गहू काढल्यानंतर तो स्वच्छ करण्यात फिल्टर यंत्रणेचा वापर केला,तर गहू अधिक स्वच्छ होतो.
नवीन गहू घेतल्यानंतर त्यात असलेल्या काचोळ्याच मातीच्या खड्यांमुळे गहू निवडावा लागतो.जर फिल्टर मशीन गहू स्वच्छ केला तर निवडण्याचा ही ताण वाचतो.
गहू या मशीनमुळे स्वच्छ होतो,त्यामुळे जर बाजारात असा गहू विक्रीला आणला, तर दोन पैसे चांगला भाव मिळतो.
– नंदेश ठाकरे, शेतकरी
हार्वेस्टरच्या वापरामुळे गहू पिकाची काढणी कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक करता येते,परंतु यंत्राने गहू काढताना हार्वेस्टरच्या दात्या गव्हाच्या बिजांना घासतात.
– प्रदीप गोरे,शेतकरी

