सुशील भोईर,वाडा
तीव्र पाणीटंचाईवर उपाययोजना करा, ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा,प्रशासनाकडून मागण्या मान्य,
वसई पूर्व भागात कामण, देवदळ,कोल्ही,चिंचोटी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होत असते.या ज्वलंत प्रश्नावर नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आजवर अनेक आंदोलने करण्यात आली.मात्र मनपा प्रशासन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयशी ठरली.यंदाही तीच परिस्थिती आहे.
त्यामुळे या सर्व गावातील ग्रामस्थांनी माजी नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ” जी,” कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.यावेळी प्रभाग समितीचे सहा.आयुक्त निलेश म्हात्रे यांनी ग्रामस्थाच्या मागणीनुसार परिसरातील विहीर साफ करून टँकरने पाणीपुरवठा सुरु करणे, ग्रामस्थांच्या मागणीनुसार २६ ठिकाणी बोरिंग ( हातपंप ) मारणे,कामण लघु पाटबंधारे योजना सुरळीत करणे,दलित वस्ती योजना सुरु करणे,२८ एप्रिलपर्यंत सूर्या प्रकल्पातून गावात स्टॅन्ड पोस्ट देणे,
इ.मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.मात्र २८ एप्रिल पर्यंत सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरु झाला नाही,तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थातर्फे माजी सरपंच ऍड.दिनेश म्हात्रे यांनी दिला आहे.

