- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई-नालासोपारा शिवसेना ( उबाठा ) फुटीच्या मार्गावर, पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे.हे दोन्ही मतदारसंघ जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्यामुळे आपल्या हातून गेल्याचा आरोप शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.काल अनेक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन हे आरोप केले.आज सकाळी जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले. २०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने लढवले होते.यावेळी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले.जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व सेनेचे वरिष्ठ नेते व माजी खा.विनायक राऊत या दोघांनी संगनमत करून हे दोन्ही मतदारसंघ घालवले,असे माजी जिल्हाध्यक्ष…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” १३० पालघर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता, १३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उबाठा )शिवसेना ( शिंदे गट ) व बविआ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.या विधानसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.माजी खा.राजेंद्र गावित यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या ४ नोव्हें.रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.शिवसेना ( उबाठा ) तर्फे जयेंद्र किसन दुबळा तर राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून रिंगणात आहेत.बहुजन विकास आघाडीही या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.त्यांच्याकडून माजी आ.अमित घोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.त्यांना उमेदवारी मिळाल्यास…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बारामतीकर,या निवडणुकीत धरणात **** लावणार… काल पुरोगामी,सुशिक्षित व सांस्कृतिक,चेहरा असलेल्या फुले,शाहू व आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात माणुसकीला काळे फासणारी घटना घडली.मेलेल्या माणसाविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही,पण अहंकाराचे गुलाबी जाकीट घातलेल्या व संस्कृतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या अजित पवार यांनी स्व.आर.आर.पाटील,यांच्यावर तोंडसुख घेतले व उभा महाराष्ट्र हळहळला.आपल्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागत असल्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.युगेंद्र पवार यांची पहिलीच जाहीर सभा,न भूतो,न भविष्यती अशी झाल्यामुळे अजित पवार यांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या व उर्मटपणा ठायी ठायी भिनलेल्या अजित पवार यांनी साधनशुचिता गुंडाळून ठेवत आपल्या…
दीपक मोहिते, वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघात बविआ हमखास बाजी मारणार, १३१ बोईसर (अनु.ज.) १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात आजपासून प्रचाराला सुरुवात होत आहे.या तिन्ही मतदारसंघात विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये असलेली नाराजी व रुसवा इ.कारणामुळे महायुती व महाविकास आघाडी पुर्णतः जर्जर झाली आहे.त्यांच्या अधिकृत उमेदवारांसमोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.आघाडी व युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरील पक्षाची स्थिती लक्षात न घेता,घेतलेले निर्णय पक्षाच्या चांगलेच अंगलट आले आहेत.या दोघांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात सामिल होतील,असे वाटत नाही.ही स्थिती लक्षात घेता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.वसई येथे विद्यमान आ.हितेंद्र ठाकूर…
दीपक मोहिते, मनोज पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे संघाचे पदाधिकारी नाराज, भाजपचे मनोज पाटील व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समीर वर्तक हे दोघेही वसई व नालासोपारा मतदारसंघातून इच्छुक होते.पण त्यांना डावलून वसई येथे भाजपने स्नेहा दुबे व काँग्रेसने संदीप पांडेय या दोघाना उमेदवारी दिली.त्यामुळे या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.त्यांच्या या नाराजीचा फटका उभय पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे. मनोज पाटील हे संघाच्या मुशीतून वरपर्यंत पोहोचलेले नेते असून त्यांनी वसई तालुक्याच्या नागरी समस्यांवर आंदोलने,मोर्चे,आदी कार्यक्रम राबवले.तसेच आपल्याला वसई मतदारसंघातून उमेदवारी मिळावी,म्हणून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले.पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
दीपक मोहिते, सहा विधानसभा मतदारसंघात एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची प्रचंड दमछाक झाली. आज एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. कालपर्यंत १२८ डहाणू- ०८,१२९ विक्रमगड-१६,१३० पालघर,-१२,१३१ बोईसर-११,१३२ नालासोपारा-१२ व १३३ वसई-२७,असे एकूण जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.उमेदवार अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान आ.विनोद निकोले,आ.सुनील भुसारा,आ.राजेश पाटील,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,यांचा समावेश आहे.या सहापैकी जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) या पक्षांच्या नाराजांचा त्यामध्ये समावेश आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी माजी…
पालघर, वसई व नालासोपारा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांची डोकेदुखी, १३२ नालासोपारा व १३३ वसई या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सध्या बंडखोरांना तोंड द्यावे लागत आहेत.महाविकास आघाडीचे वसईचे विजय पाटील व संदीप पाटील या दोघांविरोधात काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या दोन्ही घटक पक्षातील बंडखोरांनी चांगलीच उचल खाल्ली आहे.तर दुसरीकडे महायुतीचे नालासोपारा व वसई मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे राजन नाईक व स्नेहा दुबे या दोघांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे बंडखोर मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसले तरी ते प्रचारापासून दूर राहणार आहेत.वसई येथे गेली अनेक वर्षे भाजपच्या उभारणीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या…
दीपक मोहिते, सहा विधानसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल, काल दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू होती.तशीच धावपळ आज अखेरच्या दिवशी सुरू राहणार आहे.कालपर्यंत एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. कालपर्यंत १२८ डहाणू-०४,१२९ विक्रमगड-१०,१३० पालघर-०३,१३१ बोईसर-०२,१३२नालासोपारा-०५ व १३३ वसई-०३,असे एकूण २७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान आ.विनोद निकोले,आ.सुनील भुसारा,आ.राजेश पाटील,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,यांचा समावेश आहे.या सहापैकी जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) या पक्षांच्या नाराजांचा त्यामध्ये समावेश आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी…
दीपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल, आज वसई,नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती.वसई येथे आ.हितेंद्र ठाकूर,यांनी नालासोपारा येथे आ.क्षितिज ठाकूर व बोईसर येथे आ.राजेश पाटील यांनी मिरवणुकीने येऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून उद्याही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील ८० % उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत.आज सकाळी साडेनऊ वाजता आ.हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली.ढोलताशा,झेंडे, पताके मिरवत रॅली तहसील कार्यालयावर आल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, पालघर व बोईसर शिंदे गटाकडे, नालासोपारा,डहाणू,वसई,विक्रमगड भाजपला, पालघर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून या चार जागांपैकी २ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.तसेच भाजपचे माजी खा.राजेंद्र गावित व माजी आ.विलास तरे या मूळच्या भाजपच्या नेत्यांना शिंदे गटातुन उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. भाजपने जागावाटपात एकनाथ शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.त्यांनी १३२ नालासोपारा-राजन नाईक,१३० पालघर-राजेंद्र गावित,१३१ बोईसर-विलास तरे ( सध्या या दोघांना शिंदे गटातून भाजपने उमेदवारी…
