संजय लांडगे,वाडा,
वाड्यात महाविकास आघाडीकडून अमित शहा यांचा निषेध,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी त्यांचा वाडा येथे निषेध करण्यात आला. यावेळी त्यांचा राजीनामा घेण्यात यावा,अशी मागणी महाविकास आघाडी वाडा शहर व वाडा तालुका यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
आज वाडा शहरातील बस स्थानकासमोर महाविकास आघाडीच्या वतीने अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला.संविधान निर्माते, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला संविधान देवून न्याय,बंधुता, समान स्वातंत्र्य दिले आहे. त्यांनी दिलेल्या संविधानावर देश चालत आहे.ज्या महामानवाने भारत देशाला संविधान दिले,त्या महामानवाबद्दल देशाचे गृहमंत्री अवमानकारक शब्द वापरून भारत देशाच्या आंबेडकरवादी विचार धारेचा अवमान केला असून, त्यांच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांना या संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी शिवसेना(उबाठा) निलेश गंधे,गोविंद पाटील, भरत गायकवाड,तुषार भानुशाली,उमेश पठारे,प्रमोद घोलप,काँग्रेसचे प्रफुल पाटील, दिलीप पाटील,राजू पातकर, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) अमीन शेंदू,आदी पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

