दीपक मोहिते,
” साहित्य सहवास, ”
” ख्रिस्तायन २०२४,” चा ऑनलाइन नाताळ अंक प्रकाशित,
” ख्रिस्तायन,” या ऑनलाइन नाताळ अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार पॉल डिमेलो यांच्या हस्ते २३ डिसें.रोजी त्यांच्या तपस्या या राहत्या घरी झाले.याप्रसंगी त्यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देत संपादक मंडळाचे कौतुक केले व यापुढेही सातत्याने प्रकाशन होत राहो, असे मत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
दिवाळी अंकांच्या धर्तीवर नाताळ अंक काढण्याचे धाडस ख्रिस्तोफर मॅथ्यू रिबेलो यांनी “ख्रिस्तायन,” हा अंक २००२ साली छापील स्वरुपात प्रकाशित करून केले होते. पण ई-अंक सोशल मीडिया व मेलद्वारे वितरीत करणे सोपे असल्यामुळे गेली चौदा वर्षे हा अंक ऑनलाइन प्रकाशित होत आहे.पूर्णपणे नाताळ सणानिमित्ताने प्रकाशित होणारा ” ख्रिस्तायन,” हा पहिला व एकमेव ऑनलाइन नाताळ अंक आहे.नाताळ सणावेळी ख्रिस्ती समाज साहित्यिक मेजवानीपासून दूर राहू नये,यासाठी हा प्रयत्न आहे.
विविध कथा-कवितासोबत सामाजिक व विशेष अशा विषयांवरील लेखांचा अंकात समावेश आहे.वसई परिसरातील नव कवी-लेखकांच्या साहित्यकृतींनी तसेच प्रतिभावंत चित्रकारांच्या चित्रांचा तसेच सायमन मार्टिन, मुक्ता टिळक,अनुपमा उजगरे, पत्रकार जॉन कोलासो,रेमंड मच्याडो,डॉ.नेहा सावंत व कवी महेश लीला पंडीत आदी मान्यवरांच्याही साहित्यकृतींचा समावेश,या अंकात आहे. अंकासाठी तांत्रिक सहकार्य स्वप्नील रिबेलो व चार्ल्स क्लेमेंट गोम्स यांनी केले आहे. christayan.in या संकेतस्थळावरून हा अंक पीडीएफच्या माध्यमातून डाऊनलोड करता येईल.तसेच या अंकाचे अँड्रॉइड अँप ही व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे.

