वसंत भोईर,वाडा,
रोटरी क्लब ऑफ मुंबईतर्फे पाणी आणि शेतीवर आधारित प्रकल्पांचे लोकार्पण,
रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर यांनी वाडा तालुक्यातील खुपरी – भोईरपाडा येथे एक उल्लेखनीय सामाजिक प्रकल्प राबवला.त्यांनी हँड पंप बोरिंगमध्ये सुधारणा करून सोलर एनर्जीवर मोटर बसवून मोफत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.त्यामुळे स्थानिक महिलांचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचला आहे.
या प्रकल्पाला सीता फाउंडेशनचा सीएसआर फंड लाभला आहे.येत्या वर्षभरात अजून दोन बोरिंगची सुधारणा करण्यात येणार आहे.
तसेच चारणवाडी येथील शेतकऱ्यांना आंबा,काजू,पेरु, लिंबू,या फळांच्या ५०० झाडांचे वाटप करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना फळझाडांतून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी या उपक्रमाची मदत झाली आहे.
या कार्यक्रमास कंपनीचे डायरेक्टर धवल व्यास,सदस्य ललित तिवारी, रमेश,शमा,आणि इतर सदस्यांबरोबरच रोटरी क्लब मुंबई दहिसरचे राजेंद्रन उन्नीकृष्णन ( सीएसआर डायरेक्टर ),राजकुमार छेडा, पंकज देसाई, वाडा क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल बोकंद,समीर गव्हाळे,रोहित पाटील, शशांक ठाकरे,मनजीत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

