अनिता घाणेकर,पुणे,
” फ्रंटलाईन,”
” पुणे तेथे खूप काही उणे,” म्हणायची पाळी पुणेकरांवर आली आहे….
आपण पुणे या ऐतिहासिक व विद्यानगरी विषयी आजवर खूप काही ऐकत आलो.अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे शहर आता निरनिराळया कारणामुळे सतत प्रकाशझोतात येत असते.” ” पुणे तेथे काय उणे ? ” ही म्हण गेली अनेक वर्षे प्रचलित होती.पण आता ” पुणे तेथे,खूप काही उणे,” असे म्हणायची पाळी पुणेकरांवर आली आहे.
पुणे जिल्हा हा प.महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे.पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
या जिल्ह्यात आंबेगाव,इंदापूर,खेड,जुन्नर,दौंड,पुणे शहर,पुरंदर,बारामती,भोर,मावळ मुळशी,राजगड,शिरूर व हवेली,असे चौदा तालुके आहेत.ग्रामीण भागात शेती,बागायती व शहरी भागात उद्योगधंदे अशा दोन विभागात या पुणे जिल्ह्याची विभागणी झाली आहे.एकूण १ कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेला हा जिल्हा सुमारे १६ हजार चौ. की.मी.क्षेत्रात पसरला आहे.साक्षरतेचे प्रमाण ८०% इतके आहे.या शहरातील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून त्यास ” पुण्याचे ऑक्सफर्ड,” असं म्हंटलं जाते.शनिवारवाडा,
शिवनेरी,राजगड,सारसबाग,आळंदी,अष्टविनायकापैकी महागणपती,मोरेश्वर,विघ्नहर,गिरिजात्मक व लेण्याद्री हे पाच गणपती याच पुणे जिल्ह्यात आहेत.अनेक संत,तत्वज्ञानी,साहित्यिक,समाजसुधारक व
स्वातंत्र्यसेनानी या जिल्ह्याला लाभले.त्यामध्ये संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज,पेशवा,बाजीराव,
महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,स्वातंत्र्यवीर सावरकर,आगरकर,राजगुरू,गोपालकृष्ण गोखले,प्र. के.अत्रे,पु.ल.देशपांडे,भीमसेन जोशी,लोकमान्य टिळक,पंडिता रमाबाई व राजमाता जिजाऊ,अशा नररत्नांचा त्यामध्ये समावेश आहे.
मात्र गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा पार बदलुन गेला,किंबहुना चेहराच काळवंडला गेला अस म्हंटल्यास ते चूकीचे ठरू नये.पुणे शहर आता गुन्हेगार निर्मितीचे केंद्र ठरू लागले आहे.कोयता गँग,ड्रग व्यवसाय,वेश्याव्यवसाय,
हिट अँड रन,खंडणी वसुली,गुंड टोळ्यांचा धुमाकूळ व पोलिसांची हफ्तेखोरी,आदी कारणामुळे एकेकाळी जगभरात नावारूपाला आलेल्या पुण्याची वाटचाल आता विनाशाच्या दिशेने सुरू झाली आहे.त्यामुळे आता पुणेकरांवर ” पुणे तेथे खूप काही उणे,” असे म्हणायची पाळी आली आहे.

