- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी वसई – विरारच्या रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा
- सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, राजन नाईक हे आ.क्षितिज ठाकूर यांना रोखू शकतील का ? १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातुन भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षात त्यांना अंतर्गत विरोध असूनही ते उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मात्र त्यांना या निवडणुकीत पक्षातील नाराज मंडळींकडून किती सहकार्य मिळेल,हे सांगता येत नाही.वसई भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गटा तटाचे राजकारण सुरू आहे. राजन नाईक हे ज्या सामवेदी समाजाचे प्रतिनिधित्व करतात,तो समाजही शिवसेना व बहुजन विकास आघाडीत विभागला आहे.तर किनारपट्टीवर राहणारा मांगेला समाजही असाच विभागला आहे.पालघर जिल्ह्यात मांगेला समाज मोठ्या संख्येने राहतो,पण त्यांना आजवर भाजपकडून योग्य ती…
दीपक मोहिते, मुंबईच्या क्षितिजावरून, उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने मारली बाजी, मात्र त्यांच्या आयटी सेलचा चावटपणा सुरू, भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पाहिला नंबर पटकावला आहे.भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आठ दिवसापूर्वी या यादीवर मोहोर उठवल्यानंतर ( १४ ऑक्टो.) ती दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. होती.या यादीत ९९ उमेदवारांची नांवे आहेत.विशेष म्हणजे ८० % विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.केवळ पाच आमदारांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आहे.बंडखोरीची लागण मोठ्याप्रमाणात होऊ नये,यासाठी जुन्या चेहऱ्यांना पुढे चाल देण्यात आल्याचे दिसून आले आहे.इतर पक्षात जागावाटपावरून कलगीतुरा रंगत असताना भाजपने आपली यादी प्रसिद्ध करून एकप्रकारे बाजी मारली आहे. कोकण विभाग-२५, उ.महाराष्ट्र-२०, विदर्भ-१९, मराठवाडा-१८…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, जिल्ह्याचा विकास हाच आमचा श्वास,-आ.क्षितिज ठाकूर, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास कटिबद्ध आहे,त्यासाठी कायम आमचे प्रयत्न राहतील,कारण जिल्ह्याचा विकास हा आमचा श्वास आहे.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे,असे उदगार नालासोपाऱ्याचे आ.क्षितिज ठाकूर यांनी विरार येथे काढले. विरार पश्चिमेस क्लब वन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते,यावेळी व्यासपीठावर आ.हितेंद्र ठाकूर,आ.राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक,माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले,पालघर जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे,कृषी संशोधन केंद्र सुरू करणे,अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे, जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवणे,वाहतूक…
दीपक मोहिते, मुंबईच्या क्षितिजावरून… सुज्ञ मतदार,मिंध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही, कोरोनानंतर मुंबई महानगर पालिकेचा प्रशासकीय कारभार शासनानियुक्त प्रशासकाकडे गेल्यानंतर नावाजलेल्या शहराची अक्षरशः दुर्दशा झाली.प्रशासकाच्या माध्यमातून मिंध्ये सरकारने मनमानी तसेच उधळपट्टीचा कारभार करत आपले खिसे भरले.अधिकारी व मिंध्ये सरकारच्या नेत्यांनी ” आपण दोघे भाऊ भाऊ,धुसून पुसून खाऊ,” असे धोरण राबवले.या नेत्यांची व अधिकाऱ्यांची घरे भरली,पण मुंबई शहरातील करदात्यांची मात्र पार दैना झाली.चालायला धड रस्ते नाहीत,अनधिकृत फेरीवाल्यांचे पदपथावर अतिक्रमण,वाहतूककोंडी,शहर स्वच्छतेवर हजारो कोटी रु.खर्च करूनही शहराला आलेले बकाल स्वरूप,महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भ्रष्टाचाराला आलेला ऊत, रस्त्याच्या कामात बोकाळलेला आर्थिक गैरव्यवहार,निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना देण्यात येणारी कामे,कामे न करता देयके अदा…
दीपक मोहिते, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत, महाविकास आघाडीतर्फे १३२ नालासोपारा व १३३ वसई हे दोन विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार आहेत,याविषयी असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पंकज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.बविआचे क्षितिज ठाकूर,भाजपचे राजन नाईक व शिवसेनेचे ( उबाठा ) पंकज देशमुख यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल,अशी शक्यता आहे. भाजपचे राजन नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले भाजपचे नेतृत्व आहे.गेली अनेक वर्षे त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवले असून वसई तालुक्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडूनही गेले होते.२०१४ साली त्यांनी विधानसभा लढवली होती.त्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या…
दीपक मोहिते, भान, लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांचा संयम व समंजसपणा वाखाणण्याजोगा, संकटकाळात संयम,समजूतदारपणा व सामंजस्य हे तीन मानवी गुण लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांच्या ठायी ठायी भिनले आहेत,याचे प्रत्यंतर गेल्या पंधरा दिवसात जिल्हावासीयांना आले.माध्यमे राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून सर्वत्र दिशाभूल करणारी व कोणताही आधार नसताना वृत्ते प्रसारीत करत होती.पण या काळात लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर हे दोघे पितापुत्र शांतपणे आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होते.हे दोघेही आपल्या विवा महाविद्यालयातील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताना भेटत होते व त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकण्यात गर्क होते.त्यांनी दाखवलेला हा संयमी व समंजसपणा खरोखरच कौतुकास्पद असाच होता.दररोज अनेक बातम्या कानावर येत होत्या,पण त्यांनी कधीही त्यावर…
दीपक मोहिते, सुर्यातीर, बेसुमार वृक्षतोड ; सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात… १९७० च्या दशकात आकाशवाणीवर नेहमी एक गाणं आम्ही ऐकत असू,ते गाणं असायचे,”वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी,” हे गाणं आम्हाला इतकं पाठ असायचे,कि आमचे आई व बाबा म्हणायचे,अभ्यास लक्षात राहत नाही,पण गाणी मात्र चांगली लक्षात राहतात,पण त्यांनाही हे गाणं खूप आवडतं असे.आता काळ बदलला,बदल व आधुनिकतेच्या लाटांमध्ये सार काही लुप्त झाले.उरल्या त्या केवळ आठवणी…मानवजात आता वृक्षवल्ली आम्हा सोयरी मानायला तयार नाही,उलट आज तो वृक्षवल्लीच्या जीवावर उठला आहे.विकासाच्या नावाखाली मानवाने जो धुडगूस घातला आहे,तो पाहता येणाऱ्या काळात पर्यावरणाचा प्रश्न अधिकाधिक जटील होणार आहे.एकीकडे ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प तर दुसरीकडे जंगलेच नाहीशी करण्याचे षडयंत्र,अशा…
दीपक मोहिते, वसई विधानसभा मतदारसंघाचा आमदार मीच असेन – आ. हितेंद्र ठाकूर, अखेर आम्ही केलेली दोन्ही भाकीते खरी ठरली,पहिलं भाकीत होत की चहाच्या पेल्यात उठलेले वादळ लवकरच शमणार.दुसरं भाकीत होत,वसई विधानसभा मतदारसंघातून आ.हितेंद्र ठाकूर हेच बविआचे उमेदवार असतील.आज विरार येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विरार पश्चिमेस असलेल्या क्लब वन येथे आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात घोषणा केली. त्यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी त्याचे भाषण थांबवून वसई विधानसभा मतदार संघातून त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी केली.त्यानंतर बोलताना आ.ठाकूर पुढे आपल्या भाषणात म्हणाले,माझा…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, नालासोपारा विधानसभा ; भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.गेल्या दहा दिवसापासून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार,यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती.पण भाजपच्या पहिल्या यादीत नालासोपारा येथून राजन नाईक यांची उमेदवारी जाहीर होईल,असा अंदाज होता,तो खरा ठरला आहे. या मतदारसंघात डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नावांची चर्चा होत होती.पण गेली तीन दशके भाजपमध्ये सक्रिय असलेले राजन नाईक यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिली पसंती दिली.राजन नाईक यांनी २०१४ साली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती.त्यावेळी बविआचे आ.क्षितिज ठाकूर,सेनेचे शिरीष चव्हाण व भाजपचे राजन नाईक,यांच्यामध्ये…
दीपक मोहिते, वसई शिवसेनेचे ( उबाठा ) पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देणार, महाविकास आघाडीच्या जागावाटपात १३३ वसई विधानसभा मतदारासंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.मात्र ही जागा शिवसेनेला ( उबाठा ) देण्यात यावी,अन्यथा वसई तालुक्यातील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या पदाचे राजीनामे देतील,असा इशारा देण्यात आला आहे.आज वसई शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांची स्वाक्षरी असलेले पत्रक वायरल झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत १३३ वसई विधानसभा ही गेली २४ वर्षे लढवत शिवसेना लढवत आली.या मतदारसंघात शिवसेनेला चांगला जनाधार असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारती कामडी यांनी ६६…
