दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
जिल्ह्याचा विकास हाच आमचा श्वास,-आ.क्षितिज ठाकूर,
पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास कटिबद्ध आहे,त्यासाठी कायम आमचे प्रयत्न राहतील,कारण जिल्ह्याचा विकास हा आमचा श्वास आहे.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे,असे उदगार नालासोपाऱ्याचे आ.क्षितिज ठाकूर यांनी विरार येथे काढले.
विरार पश्चिमेस क्लब वन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते,यावेळी व्यासपीठावर आ.हितेंद्र ठाकूर,आ.राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक,माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले,पालघर जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणे,कृषी संशोधन केंद्र सुरू करणे,अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे, जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवणे,वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे,अशा विविध विकासकामांचा आपल्याकडून पाठपुरावा सुरू आहे.आपला बहुजन विकास आघाडी पक्ष हा प्रत्येक निवडणुकीत विकासाचे प्रश्न घेऊन मतदारांना सामोरे जात असतो,कारण आपल्याला पुढच्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.ज्यांना राजकारण करायचे आहे,त्यांनी ते करावे.पण आमच्यासाठी जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे.त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने या निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करायचे आहे.

