दीपक मोहिते,
भान,
लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांचा संयम व समंजसपणा वाखाणण्याजोगा,
संकटकाळात संयम,समजूतदारपणा व सामंजस्य हे तीन मानवी गुण लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांच्या ठायी ठायी भिनले आहेत,याचे प्रत्यंतर गेल्या पंधरा दिवसात जिल्हावासीयांना आले.माध्यमे राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून सर्वत्र दिशाभूल करणारी व कोणताही आधार नसताना वृत्ते प्रसारीत करत होती.पण या काळात लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर हे दोघे पितापुत्र शांतपणे आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होते.हे दोघेही आपल्या विवा महाविद्यालयातील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताना भेटत होते व त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकण्यात गर्क होते.त्यांनी दाखवलेला हा संयमी व समंजसपणा खरोखरच कौतुकास्पद असाच होता.दररोज अनेक बातम्या कानावर येत होत्या,पण त्यांनी कधीही त्यावर भाष्य केले नाही.या काळात विवा महाविद्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अक्षरशः जत्रा भरत होती,पण या विषयावर ते दोघे कधी अवाक्षर बोलले नाही.आ.क्षितिज ठाकूर हे देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आता चांगलेच स्थिरावले आहेत.” silence is the gold,” या इंग्लिश म्हणीप्रमाणे त्यांचे वागणं आहे.राजकारणात संयम व सबुरीला अनन्यसाधारण महत्व असते,हे आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या तीन दशकाच्या राजकीय वाटचालीत अनेकदा दाखवून दिले.त्यामुळे ते सर्वच राजकीय पक्षात लोकप्रिय आहेत.असा एकही राजकीय पक्ष नाही,की ज्याचे ज्येष्ठ नेते,खासदार,आमदार व पदाधिकारी यांनी विवा महाविद्यालयाला भेट दिली नाही.राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं असले पाहिजे,ते कधीही मैत्री आड येता कामा नये,असे या दोघा पितापुत्राचे म्हणणे आहे.गेल्या पंधरा दिवसात युट्युब चालवणाऱ्या अनेक पत्रकारांनी राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेश संबधित वारंवार छेडले,पण त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही.आज हे दोघे आपल्या असामान्य गुणांवर पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

