दीपक मोहिते,
वसई शिवसेनेचे ( उबाठा ) पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देणार,
महाविकास आघाडीच्या जागावाटपात १३३ वसई विधानसभा मतदारासंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.मात्र ही जागा शिवसेनेला ( उबाठा ) देण्यात यावी,अन्यथा वसई तालुक्यातील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी व शिवसैनिक आपल्या पदाचे राजीनामे देतील,असा इशारा देण्यात आला आहे.आज वसई शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांची स्वाक्षरी असलेले पत्रक वायरल झाले आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत १३३ वसई विधानसभा ही गेली २४ वर्षे लढवत शिवसेना लढवत आली.या मतदारसंघात शिवसेनेला चांगला जनाधार असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारती कामडी यांनी ६६ हजार ८८८ लक्षणीय मते घेतली होती,त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी,असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.शिवसेनेच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.या ठरावात ही विधानसभा जागा काँग्रेसने ज्या ज्या वेळी लढवली प्रत्येक वेळी त्यांच्या उमेदवाराची अनामत रकम जप्त झाल्याचे म्हंटले आहे.तालुकाप्रमुख राजाराम बाबर यांनी याविषयी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.शिवसेना ( उबाठा ) यांनी घेतलेल्या या ताठर भूमिकेमुळे काँग्रेसला या निवडणुकीत जबर फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

