Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, न्यूजलाईन, युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार, अमेरिका व इस्त्रायल यानी दोन दिवसापासून इराणची राजधानी तेहरानवर प्रखर बॉम्बहल्ले चढवले, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी, त्यांचे नातेवाईक व अनेक ज्येष्ठ मंत्री यांचा खात्मा झाला. इराण, अणू कार्यक्रम राबवत असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेने इस्त्रायलच्या मदतीने हे हल्ले केले, असे भासवण्यात येत असले तरी त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. अमेरिकेचा आखाती देशात असलेल्या तेलसाठ्यावर आपला कब्जा राहावा,यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेची इराक, इराण, सिरिया, अफगाणिस्तान, येमेन या तेलसंपन्न राष्ट्रावर वक्रदृष्टी आहे. सौदी अरेबिया, कुवेत, अबुधाबी व दुबई या देशांनी अमेरिकेशी मिळते जुळते घेतल्यामुळे आजच्या घडीला हे सारे देश सुरक्षित आहेत. इराण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” केजरीवाल प्रकरणी केंद्र सरकार तोंडावर आपटले, सत्तेचा हव्यास,जीवघेणे शत्रुत्व, सुडभावना व बेधुंद स्वभाव ,अशा चार कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा, हे दोघेही अक्षरशः तोंडघशी पडले. लोकशाही व्यवस्थेमध्ये वरील चार गैरप्रकाराना कधीही थारा मिळत नसतो. हे पुन्हा एक सिद्ध झाले आहे. दिल्लीच्या राऊज अँव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दोघाची सर्व आरोपामधून निर्दोष मुक्तता केली. मद्य धोरणाशी संबधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी या दोघांना तुरुंगवास भोगावा लागला होता. या सर्व घडामोडीमुळे भाजपची लक्तरे वेशीला टांगली गेली. यातून भाजप व त्यांचे अंधभक्त काही बोध घेतील, असे वाटत…

Read More

दीपक मोहिते, आमचा अभिमान मराठी टिकली, तरच महाराष्ट्र टिकेल, आज मराठी भाषा गौरव दिन,त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी २७ फेब्रु. रोजी मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी,लेखक व नाटककार वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांच्या जन्मदिनी तो साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या दिवसापासून ” राजभाषा मराठी दिन,” तर २७ फेब्रु.रोजी ” मराठी भाषा गौरव दिन,” साजरा होत असतो. २१ मे २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने हा दिन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्याचा निर्णय घेतला व तो नित्यनेमाने साजरा होऊ लागला. नव्या पिढीला मराठी भाषेचा अभिमान वाटावा, सध्याच्या डिजिटल…

Read More

दीपक मोहिते, हल्लाबोल, ग्रामीण भागातील जि.प.शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव.. महाराष्ट्र सरकार,अधून मधून राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करणार अशा बातम्या कानावर पडत असतात. पटसंख्या उतरणीला लागल्यामुळे शाळा बंद पडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे, त्यास सरकारचे शिक्षण विषयक धोरण सर्वस्वी जबाबदार आहे, असे म्हंटल्यास ते वावगे ठरू नये. आपल्या राज्याचे शैक्षणिक धोरण कायम डगमगते राहीले. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात राज्यकर्ते व सनदी अधिकाऱ्यांची बुरसटलेली मानसिकता, अंमलबजावणी यंत्रणेतील त्रुटी, आदी कारणामुळे एकेकाळी आदर्श शिक्षण व्यवस्था म्हणून नावारूपाला आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा भूतकाळात जमा होऊ लागल्या आहेत. पटसंख्या नसल्याचे कारण सांगत सरकार आता त्या बंद करू पाहत आहे. वास्तविक सरकारने बंद पडणाऱ्या…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” आता सरपंच होणार ” प्रशासक,” ; ग्रामीण भागाचा फायदा की तोटा ? राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी ग्रामीण भागाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असले तरी त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम कसे होतील, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार फेब्रु.अखेरीस मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर बाहेरचा प्रशासक नेमण्याऐवजी विद्यमान सरपंचांनाच ” प्रशासक, ” म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सरपंच व सदस्यांना सहा महिने किंवा नव्याने निवडणूक होईपर्यंत, गावाचा कारभार पाहता येणार आहे. ग्रामीण भागाचा विकास खुंटता कामा नये,तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत रहावे, असा उद्देश…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, सभागृहात ” नळावरचे भांडण,” नको,लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे, वसई विरार शहर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारणसभा ही चांगलीच वादळी ठरली.विरोधी पक्ष म्हणून प्रथमच सभागृहात असलेल्या भाजपने पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळ घातला. पक्षाला कार्यालय न दिल्यामुळे भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी सभा सुरू होण्यापूर्वी ४४ नगरसेवकांना सोबत घेऊन जोरदार ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजप व आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.हा वाद मिटतो न मिटतो तोच सभेत पोलीस कसे उपस्थित राहू शकतात ? असा प्रश्न प्रशासनाला विचारत भाजपच्या नगरसेवकांनी पुन्हा गोंधळ घातला. हा गोंधळ म्हणजे आगामी काळात सत्ताधारी,विरोधी पक्ष आणि प्रशासन, असा तिरंगी सामना होईल,अशी चिन्हे आहेत. यापूर्वी या महानगरपालिकेत…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” येणाऱ्या काळात भाजप, ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत पाहायला मिळणार, गेल्या वर्षी लोकसभा, यंदा विधानसभा व १२ स्था. स्व. संस्था व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे महायुतीने या तिन्ही निवडणुकांमध्ये बाजी मारली.महायुतीमधील प्रमुख घटक असलेल्या भाजपने चौफेर कामगिरी करत आपल्या मित्रपक्षाच्या छातीतही धडकी भरवली.या निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश हे ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत यायला पुरेसे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणारे भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपल्या वेगवेगळ्या चुली मांडल्या. मात्र, भाजप वगळता अजित…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, ( नॅशनल डेस्क ) भारत – बांगला देश ; संघर्षाचे पर्व संपुष्ठात येण्याची शक्यता, बांगला देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगला नॅशनल पार्टीने ( बीएनपी ) ३०० पैकी २०४ जागा जिंकत कट्टरवादी जमात – ए – इस्लामी या पक्षाला रोखण्यात यश मिळवले. या पक्षाला केवळ ७६ जागा जिंकता आल्या. उर्वरित १० जागा इतर पक्षानी जिंकल्या आहेत. त्यांच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावी पंतप्रधान तारिक रहमान यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिद झिया यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्यावर भ्रष्टाचार व गुन्हेगारीचे अनेक आरोप झाले होते.ते गेली अनेक भितीपोटी परदेशात वास्तव्याला होते. शेख हसीना यांचे…

Read More

दीपक मोहिते, भारताची डोकेदुखी वाढणार… कट्टर इस्लामिक उजव्या आणि बांग्ला राष्ट्रवादाची विचारसरणी असलेला बांगला नॅशनल पार्टी, या पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भारताच्या शेजारी असलेल्या बांग्लादेशात काल गुरुवारी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तब्बल ३०० सदस्य असणाऱ्या बांग्लादेशाच्या संसदेत उजव्या विचारसरणीच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ( बी. एन. पी. ) प्रचंड बहुमत मिळाले आहे. बीएनपीने तब्बल २०० चा आकडा पार केला आहे. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणे, आता निश्चित झाले आहे. ते दोन जागांवर निवडून आले आहेत. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांग्लादेशात हंगामी सरकार स्थापन करण्यात आले…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, सत्तेचा स्वार्थ आणि मराठी अस्मिता, मराठी माणसाचे हित व अस्मितेसाठी एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांची तोंडे आता एकमेकांच्या विरोधात वळू लागली आहेत. हे दोघे, निवडणुकीपूर्वी जो उद्देश उराशी बाळगून एकत्र आले,त्या उद्देशालाच या दोघांनी हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे त्यांना आता मराठी माणूस,मराठी भाषा व मराठी अस्मिता हा अजेंडा वापरता येणार नाही. मनसेने निवडणुकीचे निकाल लागताच भाजपला रोखण्यासाठी कल्याणमध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर चंद्रपूर येथे शिवसेनेने ( उबाठा ) भाजपला पाठिंबा देत उट्टे काढले. या दोन्ही घडामोडीवरून एकच निष्कर्ष निघतो,तो म्हणजे राज व उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू, हे मराठी माणसाचे हित…

Read More