Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण झालंय, भारतीय राजकारणांच्या इतिहासात गेल्या १२ वर्षांचा काळ हा अनेक राजकीय घडामोडी, उलथापालथी, साधनशूचिता व अशांततेचा काळ म्हणून ओळखला गेला. ” सत्तेसाठी काय पन, ” ही नवीन विचारधारा उदयाला आली, सत्तांतर झाले, लोकांना वाटले होते की, आपल्याला ” अच्छे दिन, ” येतील. पण प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडले. मूठभर धनदांडग्याच्या हितासाठी राबणारे सरकार तुमच्या आमच्या नशिबी आले. खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत विक्रीला महत्व येत गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचे जे स्वप्न आपल्या नेत्यांनी त्याकाळी उराशी बाळगले होते, त्याला तडा गेला. १९७५ ते १९८०…

Read More

दीपक मोहिते, मान्सूनने यंदा चांगलाच इंगा दाखवला… यंदा मान्सून अपेक्षा नसताना वेळेआधी दाखल झाला होता, नंतर मात्र तो कुठे गायब झाला, हे कळायला मार्ग नाही. मान्सून राज्यात कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतो,असा अंदाज व्यक्त करणारे हवामान तज्ञ देखील बुचकळ्यात सापडले आहेत. सद्यस्थितीत तो कुठवर पोहोचला आहे, हे सांगणे कठीण झाले आहे. तो पुन्हा कधीही दाखल होऊ शकतो, असे मोघम खुलासे करण्यात येत आहेत. मान्सूनने वाकुल्या दाखवल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत. २७ मे रोजी मान्सूनने बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात प्रवेश केला होता. तत्पूर्वी १६ मे रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्याचे अंदमान – निकोबार बेटावर आगमन झाले होते. या बेटावर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विलीनीकरण व उमेदवारी देणे,हे दोन्ही विषय कडीकुलपात बंद, गेल्या चार दिवसांपासून बहुजन विकास आघाडी हा शिवसेनेत ( शिंदे गट ) विलीन होणार व भाजप,सेनेच्या क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात माजी महापौर राजीव पाटील यांना उतरवणार, अशा वावड्या उठत होत्या. या वावड्या आता हवेतल्या हवेत विरल्या आहेत.आजच्या घडीला महायुतीमधील तिन्ही पक्षाकडे अपुरे संख्याबळ असले तरी फडणवीस व शिंदे हे दोघेही मॅनेज संस्कृतीमघ्ये माहीर असल्यामुळे ते शेवटच्या क्षणी काही करू शकतात. या दोन्ही पक्षाना बविआच्या कुबड्याचा आधार घ्यावा लागेल,असे वाटत नाही. विधान परिषदेच्या या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडे असलेले ७१ सदस्य आपल्या बाजूला वळवण्यासाठी हे दोघे कोणत्याही थराला जाऊ…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” स्थलांतरण ही निरंतर प्रक्रिया असून त्यास संविधानाचा आधार आहे… मुंबई शहरातील वांद्रे येथील अनधिकृत बांधकामे तोडल्यानंतर विस्थापित कुटुंबे वसई तालुक्यातील नालासोपारा शहरात स्थलांतरित होतील, अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. एका राजकीय नेत्याने याविषयी दिलेल्या मुलाखतीमध्ये अशाप्रकारची शक्यता वर्तवल्यानंतर या चर्चेला चांगलेच उधाण आले. अनेकानी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. पण हे स्थलांतरण सरकार रोखू शकते का ? तशी तरतूद आपल्या संविधानात असती तर गेल्या तीस ते चाळीस वर्षात मुंबई शहरात जे परप्रांतीयांचे लोंढे आदळले ते सरकारने रोखले असते. पण भारतीय संविधान त्यास अनुमती देत नाही. भारतीय संविधानातील कलम १९ ( भाषण स्वातंत्र्य व विविक्षित हक्काचे…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, ( नॅशनल डेस्कसाठी ) ” अब्राहम अकॉर्डस,” च्या सक्तीमुळे, पाकिस्तान संतापला, अमेरिका व इराण दरम्यान शांतता करार होण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने सकारात्मक पावले पडत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तान अमेरिकेवर संतापला आहे. दोन राष्ट्रात बोलणी सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकरित्या इराणसोबत शांतता करार करण्यासाठी पाकिस्तानला ” अब्राहम अकॉर्डस,” सामील होण्याची अट घातली, पण पाकिस्तानने अमेरिकेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इस्त्रायल सोबत राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी असलेला हा करार आमची मूळ विचारधारा व धोरणाच्या विरोधात आहे. अशी स्पष्ट भूमिका पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहंमद आसिफ…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, ( नॅशनल डेस्कसाठी ) युद्ध आता थांबायलाच हवे, इराण – इस्त्रायल या दोन देशातील युद्धाला येत्या २८ मे रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, यासाठी जगातील सारे देश देव पाण्यात टाकून बसले आहेत. निर्णय अंतिम टप्यात आला असला तरी समृद्ध युरेनियमचा तिढा जोवर सुटत नाही, तोवर युद्ध थांबेल,असे वाटत नाही. पाकिस्तान मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडत असला तरी ” समृद्ध युरेनियम आमच्या हवाली करा,” ही अमेरिकेची मागणी इराण मान्य करेल, असे वाटत नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये हे युद्ध अधिक काळ चालणे, हे जगातील एकाही देशाला परवडणारे नाही. हे…

Read More

दीपक मोहिते, पाऊस राज्याच्या उंबरठ्यावर ; शेतकरीवर्ग आनंदात…. मान्सून केरळमध्ये पोहोचला असून येत्या ४८ तासात कोकण किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी असून हवामानखात्याने दिलेल्या या माहितीमुळे राज्यातील शेतकरी चांगलेच सुखावले आहेत. राज्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र गेल्या महिन्याभरात उष्णतेने उच्चांक गाठल्यामुळे यावेळी मान्सूनचे आगमन लवकर होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे.गेले दोन दिवस पालघर जिल्ह्यात अधून मधून पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुगीचा ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत. राज्यात खरिपाच्या हंगामात भात,…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा खरा चेहरा समोर आला आहे… नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामागे चीनचे कारस्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात सत्तेत आलेले राजकीय पक्ष हे चीनच्या नादी लागले होते.चीन हा नेपाळमध्ये सध्या प्रचंड आर्थिक गुंतवणूक करत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प त्यांच्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने सुरु करण्यात आले आहेत. पाच महिन्यापूर्वी नेपाळमध्ये सत्तातर होऊन बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाले. त्यांनी आल्या आल्या भारतासोबत कटुता निर्माण होणारे अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली. माजी पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी आपले संबंध चीन मुळे ताणले गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर आपले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कॉक्रोच जनता पार्टी ; सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे… समाज माध्यमावर धुमाकूळ घालत असलेल्या ” कॉक्रोच जनता पार्टी, ” च्या असंख्य कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेश प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामागे ” शिक्षण व्यवस्थेतील बजबजपुरी, ” हे एकमेव कारण आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत शिक्षण व्यवस्थेचे जे बाजारीकरण झाले, त्यामुळे देशभरातील कोट्यावधी तरुणांना सध्या प्रचंड नैराश्य आले आहे. खाजगी शाळा,महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेसना रालोआच्या काळात मोकळे रान मिळाले आणि त्यांनी अक्षरशः लूट केली. त्यामुळे आज आपली शिक्षण व्यवस्था पार रसातळाला गेली आहे.केंद्रीय व राज्याच्या शिक्षण विभागात ” कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही,” अशी…

Read More

दीपक मोहिते, उशिराने सुचलेले शहाणपणा, जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग, आपले शिक्षण धोरण व शिक्षणाचा अधिकार धाब्यावर बसवणाऱ्या सरकारने उशिराने का होईना एक चांगला निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही योजना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी होणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना नुकत्याच सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडी, अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण एकत्रित पद्धतीने देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.…

Read More