- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, भाजपच्या राजन नाईक यांना स्वपक्षातून प्रचंड विरोध, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या लढतीचे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.त्यानंतर प्रचाराला रितसर सुरुवात होईल.मात्र वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघात आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू केला आहे व त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.बविआच्या तीनही उमेदवारांना मतदाराकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.या तिघांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या भेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. दरम्यान वसई व नालासोपारा,या दोन मतदारसंघाच्या संदर्भांत महाविकास आघाडीने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू लागले आहे.महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.२, कुडाळ येथे निलेश राणे व माहीममध्ये अमित ठाकरे यांचा टिकाव लागेल का ? कालच्या पहिल्या भागात आपण बारामती व इंदापूर या प.महाराष्ट्रातील दोन लढतीवर दृष्टिक्षेप टाकला होता.आज सिंधुदुर्गातील कुडाळ व मुंबईतील माहीम या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आपण वेध घेणार आहोत.गेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे आ.वैभव नाईक व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नारायण राणे,या दोघांमध्ये सामना झाला व नारायण राणे यांना १० हजार ३७६ मतांनी पराभव पत्करावा लागला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनभिषिक्त राजे,अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांना हा पराभव जिव्हारी लागला होता.त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत नाईक यांना ७० हजार ५८२ मते मिळाली तर नारायण राणे यांना…
दीपक मोहिते, बोईसर विधानसभा ; शिंदे व उबाठा गटात बंडखोरी होण्याची शक्यता, बोईसर विधानसभा मतदारसंघ हा दोन्ही शिवसेनेला डोकेदुखी ठरला आहे.ही जागा महाविकास आघाडीने शिवसेना ( उबाठा ) गटाला तर महायुतीने एकनाथ शिंदे गटासाठी सोडली आहे.उबाठा गटाकडून डॉ.विश्वास वळवी याना तर शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी जगदीश धोडी यांचे नाव आघाडीवर आहे.अशावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर दळवी व भाजपचे माजी आ.विलास तरे यांनी एन्ट्री केल्यामुळे दोन्ही गटात खळबळ उडाली आहे.विलास तरे सध्या भाजपमध्ये असून ते तिकिटांच्या शर्यतीमध्ये सुरुवातीपासून होते व आजही आहेत.पण हा मतदारसंघ जागावाटपात शिंदे गटाकडे गेल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.त्यामुळे तरे आता भाजपचा राजीनामा…
पालघर, वसई विरार शहर मनपाच्या ताफ्यात नवीन १०० इलेक्ट्रिक बसेस, आ.क्षितिज ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात यंदा नवीन १०० बसेस दाखल होणार आहेत.प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बससेवा योजनेंतर्गत या चार शहरातील नागरिकांना उत्कृष्ट प्रवासी सेवा देण्यासाठी महानगरपालिकेला भरीव आर्थिक निधी मंजूर झाला आहे.त्यापैकी १५ कोटी रु.चा पहिला हप्ता महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.हा निधी मिळावा,यासाठी नालासोपाऱ्याचे आ.क्षितिज ठाकूर हे गेले वर्षभर पाठपुरावा करत होते.अखेर त्यांच्या प्रयत्नाला चांगले यश मिळाले. या योजनेंतर्गत महानगरपालिकेला ३६ कोटी रु.चा निधी मंजूर झाला असून या निधीतून बसखरेदी,नालासोपारा व नवघर बस आगाराची कामे मार्गी लागणार आहेत.तसेच केंद्रसरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील ओलेक्ट्रा कंपनीच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ …तर अजित पवार यांच्या राजकारणाला उतरती कळा लागेल.. राज्याच्या चार ते पाच मतदारसंघाच्या निवडणुकांकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.त्यामध्ये बारामती,माहीम, इंदापूर,महाड व कवठे-महांकाळ या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.सुशिक्षित व संस्कारी अशी ओळख असलेल्या युगेंद्र पवार यांच्या पाठीशी संपूर्ण पवार घराणे असून येथे अजित पवार यांना युगेंद्र पवार यांच्याशी एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना काकाश्री शरद पवार व बहीण सुप्रिया सुळे यांनी धोबीपछाड दिल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.आता या विधानसभा निवडणुकीत…
दीपक मोहिते, जीवनाचा एक अविरत संघर्ष… प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘ बॅड पॅच,’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात आपल्या करीयरमध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते.नड येते, आणि बहुदा हे सारं एकदमच,एकाच वेळी घडतं..!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो… आपण कितीही नको म्हंटलं,टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतोच येतो. संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो,अन आपल्याला तो भोगावा, व अनुभवावाच लागतो.कितीही नकोसा वाटला,कितीही त्रास झाला तरी या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई व नालासोपारा जागांवर महाविकास आघाडी बविआला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत, वसई विधानसभा लढवण्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.पालघर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ताकद नगण्य असल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या वाट्याला आलेल्या १३१ वसई विधानसभेची जागा ते लढवतील,अशी शक्यता वाटत नाही.पालघर जिल्ह्यात सहापैकी वसईची जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.नालासोपारा,पालघर व बोईसर- शिवसेना ( उबाठा ) डहाणू- मार्क्स.कम्यु.व विक्रमगड-राष्ट्रवादी काँगेस ( शरद पवार ) असे जागावाटप करण्यात आले आहे.भाजपने १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे,वसई विधानसभा मतदारसंघात पण महायुतीकडून उमेदवार देण्यात येणार आहे.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात बविआविरोधात महाविकास आघाडीने…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीची लागण, महाविकास आघाडी व महायुती,या दोघांचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे.१५ ते २० जागांवरून सध्या ज्या हाणामाऱ्या सुरू आहेत,त्या पण एकदोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे ८५:८५:८५ असा फार्म्युला महाविकास आघाडीने सर्वसंमत केला.१५ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असून उर्वरित १८ जागाचा तिढा कसा सोडवायचा,यासाठी शरद पवार जोरदार प्रयत्न करत आहेत.या अठरा जागांपैकी १२ ते १३ जागा विदर्भातील आहेत.वास्तविक विदर्भात सेनेला फार मोठा जनाधार आहे,अशी परिस्थिती नाही.पण संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आपापसातील भांडणामुळे हा तिढा अधिक जटील झाला आहे.पण यातून मार्ग…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.राजेश पाटील ; ” आपल्या हक्काचा माणूस,” विकासकामांवर ८३० कोटी रु.खर्च करणारा लोकप्रतिनिधी, बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८३० कोटी रु.चा निधी खर्च केला असून हा एक विक्रमच म्हणावा लागेल.या निधीतून त्यांनी केलेली विकासकामे,ही विरोधी उमेदवारांची झोप उडवणारी ठरली आहेत. या निधीतून त्यांनी बोईसर मतदारसंघाच्या ग्रामीण व शहरी भागात रस्ते,स्मशानभूमी,समाज मंदिरे,पाणीपुरवठा,साकव,पूल,वसतीगृहे इमारती,तरंगती जेट्टी,जेट्टीची दुरुस्ती,चक्रीवादळ निवाराकेंद्र व अन्य पायाभूत सुविधा विकास कामावर खर्च केला.त्यांनी केलेल्या विकासकामामुळे बोईसरच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहराच बदलला गेला.मेरिटाईम बोर्ड,जलजीवन मिशन,पर्यटन,भौतिक पायाभूत सुविधा,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम,सार्व.बांधकाम विभाग,डोंगरी विकास,आदिवासी विकास विभाग व अन्य विभागाकडे आ.राजेश पाटील यांनी आर्थिक निधी मिळावा…
दीपक मोहिते, शिवसेनेचे ( उबाठा ) जयेंद्र दुबळा व डॉ.विश्वास वळवी यांना अनुक्रमे पालघर व बोईसर येथून उमेदवारी.. काल शिवसेनेच्या ( उबाठा ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली,यादीत एकूण ६५ उमेदवारांची नांवे जाहीर करण्यात आली आहेत.पालघरहुन जयेंद्र दुबळा व बोईसर येथे डॉ.विश्वास वळवी या दोघांना संधी देण्यात आली आहे.वास्तविक या दोन्ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येतील,असा अंदाज होता. पण जयेंद्र दुबळा यांना पालघर या महत्वाच्या जागेवर संधी मिळेल,असे शिवसैनिकांच्या ध्यानीमनीही नव्हते.येथून डॉ.विश्वास वळवी यांना उभे करण्यात येईल,असा सर्वसाधारण अंदाज होता,पण त्यांना शेजारी असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात ट्रान्सफर करण्यात आले.डॉ.विश्वास वळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले…
