दीपक मोहिते,
२९ गावांच्या सुनावणीला गाव बचाव समितीचा विरोध,
२९ गावाचा महानगरपालिकेत समावेश करण्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुनावणी सुरू आहे.त्या सुनावणीला गाव बचाव समितीने हरकत घेतली असून तशा आशयाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आली आहे.
सदर सुनावणी ही वसई विरार परिसरात होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत ती त्वरित तहकूब करण्यात यावी,अशी मागणी गाव बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.या गावापैकी १३ गावे पेसा योजनेंतर्गत येतात,त्यामुळे ही गावे महानगरपालिकेत सामील करणे,बेकायदेशीर असल्याचे समितीचे म्हणणे आहे.पण प्रशासनाने सुनावणी सुरूच ठेवली आहे.राज्यसरकारने याविषयी अधिसूचना जारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सलग पाच दिवस ही सुनावणी ठेवली आहे.ती १६ डिसें.पासून सुरू झाली असून ती २० डीसे.पर्यंत चालणार आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घ्यायला गेलेल्या शिष्टमंडळात विजय पाटील,पायस मच्याडो,जॉन परेरा,डॉमनिका डाबरे,मिलिंद खानोलकर व अन्य पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

