संजय नेवे,विक्रमगड,
पालघर जिल्ह्यात आजपासून कुष्ठमुक्त अभियानाला सूरुवात,
पालघर जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा व तालुक्यातील कुष्ठरोग मुक्त मोहिमेच्या शुभारंभ आज विक्रमगड येथील मान आश्रम शाळेत करण्यात आला.कुष्ठरोगाचा मुळापासून उच्चाटन करण्यासाठी १६ ते २० डिसें.या पाच दिवसात तालुक्यातील ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत १२ आश्रम विद्यार्थी खाण कामगार,वीटभट्टी कामगार, शेतमजूर,यांची तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यात गेल्या वर्षी या आजाराचे २१० रुग्ण आढळले होते.या रुग्णांवर औषध उपचार करून ही रुग्णसंख्या कमी करण्यात आली. आता फक्त ६० रुग्ण या तालुक्यात उपचार घेत असून या रोगाचा मुळापासूनच नायनाट करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर यांनी दिली.आज झालेल्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती विनोद भोईर प्रशालेचे मुख्याध्यापक आरोग्य विभागातील कर्मचारी शिक्षक पत्रकार आदी उपस्थित होते.

