वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
कुणबी समाजाचा वधूवर परीचय मेळावा दिमाखदारपणे संपन्न,
समाजातील लग्न इच्छुक वधू व वरांना एका मंचावर येवून त्यांचा परीचय मिळावा व समोरासमोर बसून बोलता यावे,यासाठी वसई विरार कुणबी समाज मंडळाने चौथा वधूवर परीचय मेळावा आज साई प्रतिष्ठान अकलोली येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी पालघर व ठाणे जिल्ह्यातील वधू व वरांनी आपली नोंदणी केली होती.एकूण दोनशे पन्नास इतकी नोंदणी झाली होती.या उपक्रमास समाजातील पालकांनी प्रचंड प्रतिसाद लाभला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष वेखंडे उपाध्यक्ष डॉ.शरद भोईर खजिनदार किरण पाटील व वधूवर परीचय उपक्रम प्रमुख सुनील पाटील यांनी उपस्थित असलेल्या समाजबांधवांचे स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी कुणबी प्रतिष्ठानचे उदय पाटील उद्योजक अशोक पाटील-ग्रीन हिल रिसॉर्टचे सुनिल चोघळा उपस्थित होते.समाजातील लग्न इच्छुक तरूण तरूणी शिक्षण,नोकरी निमित्ताने इतरत्र विखुरले असल्याने त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या निमित्ताने मंडळाने वधूवर परीचय मेळावा आयोजित केला होता.पुढील वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची इच्छा विनोद पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश तुकाराम गोतारणे व मृणाल पाटील यांनी केले.या कार्यक्रमामध्ये कॅलेंडरचे प्रकाशन व वितरण करण्यात आले.

