Author: दीपक मोहिते

सद्दाम शेख,मोखाडा, मोखाडा येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखाड्यात जश ने ईद मिलाद कमेटी व आय झोन ऑप्टिकल्स नासिकचे डॉ.आयशा शेख,डॉ इम्रान शेख इ.उपस्थित होते.त्यांच्या सहकार्याने मोखाडा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये शंभरहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.कमेटीचे अध्यक्ष जमशिद ( लारा ) शेख, कार्याध्यक्ष हाजी आरिफ,मोलाचे सहकार्य राजु इसुफ शेख,अफसर शेख, नसीर शेख तसेच जशने ईद मिलाद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्यातर्फे आज रात्री इमाम अहमद रजा मदरसा मधील मुला,मुलींचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.आज तकरीर ( प्रवचन ) नात याचे आयोजन केले असून उद्या कव्वालीचा शानदार मुकाबला…

Read More

दीपक मोहिते, २९ गावांच्या सुनावणीला गाव बचाव समितीचा विरोध, २९ गावाचा महानगरपालिकेत समावेश करण्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुनावणी सुरू आहे.त्या सुनावणीला गाव बचाव समितीने हरकत घेतली असून तशा आशयाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आली आहे. सदर सुनावणी ही वसई विरार परिसरात होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत ती त्वरित तहकूब करण्यात यावी,अशी मागणी गाव बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.या गावापैकी १३ गावे पेसा योजनेंतर्गत येतात,त्यामुळे ही गावे महानगरपालिकेत सामील करणे,बेकायदेशीर असल्याचे समितीचे म्हणणे आहे.पण प्रशासनाने सुनावणी सुरूच ठेवली आहे.राज्यसरकारने याविषयी अधिसूचना जारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सलग पाच दिवस ही सुनावणी ठेवली आहे.ती १६ डिसें.पासून सुरू झाली असून ती २० डीसे.पर्यंत…

Read More

दीपक मोहिते, कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती, महाराष्ट्राची वाटचाल,बिहार होण्याच्या दिशेने, गेल्या अडीच वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खालावली आहे.दिवसागणिक हत्या,अपहरण,बलात्कार, वाहने जाळणे,हिट अँड रन, अशा घटना वारंवार घडत असतात.त्यावर नियंत्रण आणण्याकामी पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पोलीसच आता गुन्हेगारांच्या भूमिकेत वावरू लागल्याचे दिसून आले आहे.परभणी येथे जे काही घडले,ते पोलिसांसाठी लांछनास्पद असून गृहविभागाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.कायद्याची परीक्षा देण्यासाठी परभणीत आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी,या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला.त्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात परभणी शहर पेटले. या शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची १० डिसें.रोजी अज्ञात व्यक्तीकडून…

Read More

दीपक मोहिते, ” अशांत महायुती,” अजित पवार यांनी फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भुजबळ यांची केली शिकार, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार व छगन भूजबळ या दोघांना फडणवीस व भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आहे.मनोज जरांगे यांना मी अंगावर घेतल्यामुळे मला कटकारस्थान करून संधी नाकारल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.त्याचबरोबर भुजबळ यांनी ” मी तुमच्या हातामधील खेळणे आहे का ?” असा प्रश्न फडणवीस व अजित पवार यांना विचारला आहे. मनोज जरांगे यांच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी महायुतीने अत्यंत आक्रमक असलेल्या भुजबळ यांचा मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान बेमालूमपणे वापर केला.छगन भुजबळ यांनीही जरांगे पाटलांवर प्रखर…

Read More

दीपक मोहिते, ” वास्तव,” ” नव्या सरकारने ग्रामीण शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे,” गेल्या काही वर्षात राज्याच्या शिक्षण प्राथमिक शिक्षण विभागाने ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजवले.बंद पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा,या ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा अश्मयुगात नेऊन ठरल्या आहेत. गेल्या वर्षी शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे त्या बंद करण्याचा घाट घातला होता.परंतु याप्रश्नी काही सामाजिक संघटनानी विरोध केल्यानंतर सरकारने तूर्तास निर्णय स्थगित केला आहे.पण हा धोका अद्याप टळलेला नाही.आज ना उद्या सरकार त्याची अंमलबजावणी करेल.कारण मुलेच शाळेत येत नसतील,तर सरकार शिक्षकांना बसून वेतन देणार नाही.ही भयावह स्थिती का निर्माण झाली,याविषयी मंथन करण्याऐवजी सरकार ही व्यवस्थाच…

Read More

वसंत भोईर,वाडा ग्रामीण, कुणबी समाजाचा वधूवर परीचय मेळावा दिमाखदारपणे संपन्न, समाजातील लग्न इच्छुक वधू व वरांना एका मंचावर येवून त्यांचा परीचय मिळावा व समोरासमोर बसून बोलता यावे,यासाठी वसई विरार कुणबी समाज मंडळाने चौथा वधूवर परीचय मेळावा आज साई प्रतिष्ठान अकलोली येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी पालघर व ठाणे जिल्ह्यातील वधू व वरांनी आपली नोंदणी केली होती.एकूण दोनशे पन्नास इतकी नोंदणी झाली होती.या उपक्रमास समाजातील पालकांनी प्रचंड प्रतिसाद लाभला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष वेखंडे उपाध्यक्ष डॉ.शरद भोईर खजिनदार किरण पाटील व वधूवर परीचय उपक्रम प्रमुख सुनील पाटील यांनी उपस्थित असलेल्या समाजबांधवांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी कुणबी प्रतिष्ठानचे उदय पाटील उद्योजक अशोक…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, पालघर जिल्ह्यात आजपासून कुष्ठमुक्त अभियानाला सूरुवात, पालघर जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा व तालुक्यातील कुष्ठरोग मुक्त मोहिमेच्या शुभारंभ आज विक्रमगड येथील मान आश्रम शाळेत करण्यात आला.कुष्ठरोगाचा मुळापासून उच्चाटन करण्यासाठी १६ ते २० डिसें.या पाच दिवसात तालुक्यातील ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १२ आश्रम विद्यार्थी खाण कामगार,वीटभट्टी कामगार, शेतमजूर,यांची तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यात गेल्या वर्षी या आजाराचे २१० रुग्ण आढळले होते.या रुग्णांवर औषध उपचार करून ही रुग्णसंख्या कमी करण्यात आली. आता फक्त ६० रुग्ण या तालुक्यात उपचार घेत असून या रोगाचा मुळापासूनच नायनाट करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर यांनी दिली.आज झालेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सुधीर मुनगुंटीवार यांचा एकनाथ खडसे होण्याची दाट शक्यता, राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवर प्रचंड नाराज झाले असून ते लवकरच केंद्रीय नेते नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.मुनगुंटीवार हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यांना डावलण्यामागे भाजपमधील एका गटाचे कारस्थान असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. सुधीर मुनगुंटीवार हे भाजपमध्ये ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.२०१४ साली भाजप – शिवसेना युतीला यश मिळाल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्नशील होते,पण त्यावेळी त्यांची गडकरी यांनी समजूत काढली व त्यांनी माघार घेतली.त्यांच्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला होता.मात्र या नेत्याच्या डोक्यातील सल मात्र निघू शकली…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीचे पुढील लक्ष्य मुंबई,ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल २१ दिवसांनी काल राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले.महायुतीमध्ये सलग १५ ते १६ दिवस जोरदार धमासान झाल्यानंतर कोणाला किती मंत्रिपदे,यावर कशीबशी तडजोड झाली.शिंदे गटातील वाचाळ मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपने यावेळी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती व त्यांच्या गटाचे अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,तानाजी सावंत यांना बाहेरचा रस्ता दाखवला.तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे,त्रासदायक ठरले.दुसरे एक नेते दिलीप वळसे पाटील,यांचे आजारपण व वाढते वय,अशी दोन कारणे पुढे करत,त्यांनाही घरी बसवण्यात आले. मंत्रिमंडळाची रचना करताना भाजपने अतिशय धूर्त खेळी केल्याचे दिसून…

Read More

दीपक मोहिते, महायुती सरकारने पालघर जिल्ह्यावर पुन्हा अन्याय केला, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीने पालघर जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत.पालघर जिल्ह्यात महायुतीचे एकूण पाच आमदार निवडून आले आहेत.त्यापैकी स्नेहा दुबे पंडित,राजन नाईक व हरिश्चंद्र भोये हे तिघे नवखे आहेत.पण राजेंद्र गावित किंवा विलास तरे या दोघांपैकी एकाला संधी मिळेल,अशी पालघरवासियांची अपेक्षा होती,पण हे दोघे शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आले आहेत.त्यांना मंत्रिपद दिल्यास या जिल्ह्यावर निर्माण झालेले आपले वर्चस्व कालांतराने धोक्यात येईल,त्यामुळे त्यांनी पालघर जिल्ह्याला डावलले.याप्रकरणी शिंदे गटाचे एकमात्र चालले नाही. पालघर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले असताना,त्यांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची होती,परंतु राजकीय हाराकिरीमध्ये शिंदे…

Read More