सद्दाम शेख,मोखाडा,
मोखाडा येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न,
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखाड्यात जश ने ईद मिलाद कमेटी व आय झोन ऑप्टिकल्स नासिकचे डॉ.आयशा शेख,डॉ इम्रान शेख इ.उपस्थित होते.त्यांच्या सहकार्याने मोखाडा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये शंभरहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.कमेटीचे अध्यक्ष जमशिद ( लारा ) शेख, कार्याध्यक्ष हाजी आरिफ,मोलाचे सहकार्य राजु इसुफ शेख,अफसर शेख, नसीर शेख तसेच जशने ईद मिलाद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्यातर्फे आज रात्री इमाम अहमद रजा मदरसा मधील मुला,मुलींचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.आज तकरीर ( प्रवचन ) नात याचे आयोजन केले असून उद्या कव्वालीचा शानदार मुकाबला होणार आहे या कव्वालीमध्ये टीव्ही स्टार अजीम नाजा आणि दुसरे कवाल शाकिब अली साबरी आपली अदाकारी सादर करणार आहेत.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या भोजनाची सोय मिलादुनबी कमेटीतर्फे करण्यात आली आहे,अशी माहिती कमेटीचे अध्यक्ष जमशिद (लारा) शेख व सुन्नी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गुलाब मणीयार यांनी दिली.

