- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवारजी,आ.हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे धाडस दाखवा, राजकारणात कधी काहीही घडू शकते,हे आज नाशिकचे माजी आ.माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिलेल्या सल्ल्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास गेल्या काही दिवसांपासून मागे पुढे करत असताना कोकाटे यांनी त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा,अशी ऑफर दिली.पक्षाचे अध्यक्ष इतरांना उमेदवारी देत असतात,पण कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा सुरक्षित मतदारसंघ असून अजित पवार यांनी येथून उभे राहावे,असा मानभावी सल्ला दिला आहे.त्यांच्या या सल्ल्यानंतर काही क्षणात अजित पवार यांनी ” बारामती माझी आहे,त्यामुळे माझ्या घरट्यात मी जाणार,” असे स्पष्ट केले.कोकाटे यांनी जी ऑफर दिली,त्यावरून बारामती…
दीपक मोहिते, धडाडीचे नेतृत्व, आदिवासींचे नेते काळूराम धोदडे काळाच्या पडद्याआड, आदिवासीचे आधारस्तंभ व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे काळूराम काकड्या धोदडे काका हे एक बहुआयामी नेते होते.आज त्यांचे वृद्धापकाळामुळे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. जल,जमीन व जंगल,यावर आदिवासींचा हक्क आहे,तो त्यांना मिळायला हवा,यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या काळूराम धोदडे यांना आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्व व त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता.भूमिसेना व आदिवासी एकता परिषद,या दोन संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजासाठी अनेक आंदोलने केली.आपला समाज हा स्वाभिमानाने जगला पाहिजे,असे स्वप्न त्यांनी कायम आपल्या उराशी बाळगले.त्यांनी वेठबिगारी,लगीनगडी, घरगडी,खावटी व पालमोड अशा प्रथा मोडून काढल्या.गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते,पण त्यांनी काम थांबवले नव्हते.त्यांच्यावर आज…
दीपक मोहिते, सूर्यातीर, आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न व समस्या आजही ” जैसे थे,” स्थितीतच, काल मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत महायुतीच्या सरकारने एका दमात ८० निर्णय घेण्याचा विक्रम नोंदवला.यापूर्वी झालेल्या तीन ते चार बैठकीतही २०० ते २५० निर्णय घेतले होते.हा एकप्रकारे विक्रमच म्हणावे लागेल.निवडणुकीवर डोळा ठेवून सरकार हे अशाप्रकारच्या उचापती करण्यात रममाण झाल्याचे पाहायला मिळत आहे.पण घेतलेले निर्णय हे तुमचे-आमचे हित साधण्यासाठी नसून पक्षीय स्वार्थ साधण्यासाठी आहेत.हे एका घटनेवरून सिद्ध झाले आहे.मंत्रीमंडळाच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री हे मधूनच निघून गेले,कारण अजित पवार गटाच्या अनेक प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी थेट वाटाण्याच्या अक्षता लावल्या.त्यामुळे अजित पवार यांनी संतापाच्या भरात बैठक अर्ध्यात सोडली.आता ते काही कारणे सांगत सारवासारव करत…
शिंदे/फडणवीस काका,माझ्या प्रश्नाची उत्तरे देशाल का ? १) आमच्या बापाच्या आत्महत्या थांबवणार का ? २) आदिवासी बालकांच्या कुपोषणावर तुमचे सरकार उपाययोजना करणार का ? ३) ग्रामीण भागातील आमची शिवारे पाण्याने भरतील का ? ४) भूमीपुत्राच्या शेतीला पीक विमा योजनेचे लाभ मिळणार का ? ५) ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात घालण्याची सरकारची कटकारस्थाने तुम्ही रोखणार आहात का ? ६) रोजगाराअभावी ग्रामीण भागातील तरुण उध्वस्त होतोय,त्याच्या हाताला काम देणार आहात का ? ७) अंगणवाडीच्या पोषण आहारातील भ्रष्टाचार व गैरप्रकार तुम्ही थांबवणार आहात का ? ८) आश्रमशाळामधील गोरगरीब विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल तुम्ही थांबणार आहात का ? ९) राज्यातील लाखो खेडी…
दीपक मोहिते, साळसूदपणा, धनगर-धनगड प्रकरण ; ” र,” चा ” ड,” कसा झाला ? सरकारच कमकुवत आहे, पेशवाईच्या काळात ” ध,” चा ” मा,” झाला आणि पेशवाईला ग्रहण लागले.या इतिहासाची आठवण राज्यात घडलेल्या एका घटनेमुळे आपल्याला नुकतीच झाली. राजकारणात अधून-मधून असे प्रकार सतत होत असतात.त्यावर ओरड झाली कि राज्यकर्ते टायपिंग मिस्टेक झाली,म्हणून सारवासारव करत असतात.किंवा आम्हाला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढल्याचे सांगत आपली कातडी वाचवत असतात.तसाच प्रकार धनगर आरक्षणासंदर्भात झाला आहे.राज्यशासनाने धनगर आरक्षणासंदर्भात काढलेले शुद्धीपत्रक या समाजाने आंदोलन छेडल्यानंतर घाईघाईने रद्द केले. या शुद्धीपत्रकात ” धनगर ऐवजी धनगड,” असे म्हंटले होते.त्यावरून धनगर समाज आक्रमक झाला व त्या समाजाच्या नेत्यांनी…
दीपक मोहिते, राज्यसरकारची ” अशी ही बनवाबनवी,” आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील १५ जातीचा इतर मागास वर्गात समावेश करणे व पत्रकारांसाठी महामंडळ नेमणे,असे दोन निर्णय घेतले आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने केंद्र सरकारला तशी शिफारस केली आहे.राज्यात काही पोटजाती आहेत,त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात यावा,असा निर्णय आयोगाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला होता.त्यानंतर आयोगाने याविषयी केंद्र सरकार दरबारी प्रस्ताव दाखल केला आहे.या आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयासोबत राज्यसरकारने पत्रकारांसाठी महामंडळ नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.२०१४ साली ” १५ लाख तुमच्या खात्यात जमा करणार,” हा जसा जुमला होता,त्याच धर्तीवर शिंदे सरकारची…
दीपक मोहिते, पालघर व ठाणे जिल्ह्याला परतीच्या पावसाचा दणका, काल सांयकाळी पालघर व ठाणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.विजेचा कडकडाट व प्रचंड गडगडाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग पार हडबडून गेला आहे.आजही अतिवृष्टी होईल,असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.त्यामुळे शेतकरी सावध झाले आहेत. सलग चार दिवस पाऊस पडेल,असा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.काल सांयकाळी सलग चार तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यातील भातशेतीचे किती नुकसान झाले,याबाबत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी अनेक हेक्टर शेतीमधील तयार झालेली भाताची रोपे आडवी झाल्याचे समजते.काल झालेल्या पावसाचे रौद्र रूप पाहिल्यानंतर शेतकरी आता भितीच्या सावटाखाली आले आहेत.अशा परिस्थितीत…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, शिवसेनेचा दसरा मेळावा ; भावी राजकारणाची दिशा ठरणार का ? सालाबादप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा,हा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बिकेसी मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.या दोघांच्या दसरा मेळाव्यासोबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे देखील आता दसरा मेळावा घेण्यासाठी सरसावले आहेत,त्यांचा मेळावा कुठे होणार आहे,याविषयी अद्याप माहिती उपलब्ध नाही. या दसरा मेळाव्याचा इतिहास व अविभक्त सेनेची वाटचाल,याविषयी आपण माहिती घेऊया.अविभक्त शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा सेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ३० ऑक्टो.१९६६ रोजी शिवाजी पार्कवर घेतला होता.तेंव्हापासून सेनेचा दसरा मेळावा व शिवाजी पार्क,असे अतूट नाते निर्माण झाले होते.ते…
दीपक मोहिते, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी काल रात्री मुंबईच्या बीच कँडी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.ते गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.२८ डिसें.१९३७ रोजी त्यांचा जन्म झाला होता.रतन टाटा हे केवळ उद्योगपतीच नव्हते तर ते सामाजिक बांधिलकी जपणारी महनीय व्यक्ती अशी त्यांची जगभरात ओळख होती.देशावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी ते कायम मदतीसाठी पुढाकार घेत असत. एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी जगात नाव कमावले,टाटा समूहातील अनेक कंपन्यांचा विस्तार करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.सन २००० मध्ये त्यांना पद्मभूषण व २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून केलेली कामगिरी प्रशंसनीय होतीच,पण…
दीपक मोहिते, समजूतदारपणा, पक्षांतर ; वावगं काही नाही,पण धोके अनेक, पक्षांतर,ही एक निरंतर प्रक्रिया आहे,ती सतत चालूच असते.ती योग्य कि अयोग्य ? याविषयी मत मतांतरे आहेत.प्रत्येकाला सत्तेच्या राजकारणाची गरज असते,तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो.तशी इच्छा असणे,हे गैर नाही.कारण तो मानवी स्वभाव आहे.स्वार्थ आणि सत्ता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यातून एकही राजकारणी सुटलेला नाही. २०१४ साली मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची पळापळ सुरू झाली.ते वादळ इतके भयावह होते कि प्रत्येक राजकीय नेत्याला या वावटळीत आपले अस्तित्व टिकणे कठीण आहे,असे वाटू लागले व त्यांची पळापळ सुरू झाली.समुद्रात जहाज बुडू लागलं कि सर्वप्रथम जहाजातील उंदीर पळू लागतात.कारण प्रत्येकाला…
