शिंदे/फडणवीस काका,माझ्या प्रश्नाची उत्तरे देशाल का ?
१) आमच्या बापाच्या आत्महत्या थांबवणार का ?
२) आदिवासी बालकांच्या कुपोषणावर तुमचे सरकार उपाययोजना करणार का ?
३) ग्रामीण भागातील आमची शिवारे पाण्याने भरतील का ?
४) भूमीपुत्राच्या शेतीला पीक विमा योजनेचे लाभ मिळणार का ?
५) ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात घालण्याची सरकारची कटकारस्थाने तुम्ही रोखणार आहात का ?
६) रोजगाराअभावी ग्रामीण भागातील तरुण उध्वस्त होतोय,त्याच्या हाताला काम देणार आहात का ?
७) अंगणवाडीच्या पोषण आहारातील भ्रष्टाचार व गैरप्रकार तुम्ही थांबवणार आहात का ?
८) आश्रमशाळामधील गोरगरीब विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल तुम्ही थांबणार आहात का ?
९) राज्यातील लाखो खेडी आजही अंधारात चाचपडत आहेत,ती प्रकाशमान करणार आहात का ?
१०) ग्रामीण भागातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी होणारी वणवण थांबवणार आहात का ?
११) सभेतून आरडाओरड करत फिरण्यापेक्षा ग्रामीण भागातील जनतेचे जीवन सुसह्य व्हावे,यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का ?
जर या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही देऊ शकत नसाल तर कोणत्या तोंडाने मते मागायला आमच्या दारात येणार आहात ?
केवळ गुलाबी जाकीटस घालून ” लाडक्या बहिणी,” कोकलत फिरून लोक तुम्हाला दारात उभे करतील,अशा भ्रमात राहू नका,
एक निराधार बालक,

