दीपक मोहिते,
पालघर व ठाणे जिल्ह्याला परतीच्या पावसाचा दणका,
काल सांयकाळी पालघर व ठाणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.विजेचा कडकडाट व प्रचंड गडगडाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग पार हडबडून गेला आहे.आजही अतिवृष्टी होईल,असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.त्यामुळे शेतकरी सावध झाले आहेत.
सलग चार दिवस पाऊस पडेल,असा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.काल सांयकाळी सलग चार तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यातील भातशेतीचे किती नुकसान झाले,याबाबत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी अनेक हेक्टर शेतीमधील तयार झालेली भाताची रोपे आडवी झाल्याचे समजते.काल झालेल्या पावसाचे रौद्र रूप पाहिल्यानंतर शेतकरी आता भितीच्या सावटाखाली आले आहेत.अशा परिस्थितीत जर पुन्हा पाऊस झाला तर मात्र भातपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होईल,अशी भिती ते व्यक्त करत आहेत.

