दीपक मोहिते,
धडाडीचे नेतृत्व,
आदिवासींचे नेते काळूराम धोदडे काळाच्या पडद्याआड,
आदिवासीचे आधारस्तंभ व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे काळूराम काकड्या धोदडे काका हे एक बहुआयामी नेते होते.आज त्यांचे वृद्धापकाळामुळे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले.
जल,जमीन व जंगल,यावर आदिवासींचा हक्क आहे,तो त्यांना मिळायला हवा,यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या काळूराम धोदडे यांना आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्व व त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता.भूमिसेना व आदिवासी एकता परिषद,या दोन संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजासाठी अनेक आंदोलने केली.आपला समाज हा स्वाभिमानाने जगला पाहिजे,असे स्वप्न त्यांनी कायम आपल्या उराशी बाळगले.त्यांनी वेठबिगारी,लगीनगडी, घरगडी,खावटी व पालमोड अशा प्रथा मोडून काढल्या.गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते,पण त्यांनी काम थांबवले नव्हते.त्यांच्यावर आज सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

