- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज व उद्धव यांची टाळी वाजेल,असे वाटत नाही… पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या देशासमोर असलेले अनेक विषय विस्मरणात गेले.महागाई,बेरोजगारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्यात धोरण व त्याचे होणारे संभाव्य परिणाम,इ.महत्वाच्या प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.या सर्व प्रश्नासोबत आणखी एक महत्वाचा राजकीय प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.तो म्हणजे राज व उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे,होय.ही चर्चा देखील आता मागे पडली आहे.हे दोघे भाऊ सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे दोघेही मुंबईत परतणार आहेत.त्यानंतर हे दोघे भाऊ एकमेकांना टाळी देतात का ? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज यांनी पक्ष सोडताना ” माझा…
वसंत भोईर,वाडा गडांतरानंतरही टायर रिसायकलिंग कंपन्या जोमात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंगच्या कंपन्या सुरू असून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तक्रारी झाल्यानंतर अनेक टायर कंपन्यांवर गडांतर आले.तरीपण नव्याने असंख्य कंपन्यांचे उभारणीचे काम जोमाने सुरू आहे.यात प्रामुख्याने वडवली,दिनकर पाडा,तोरणे,सपना,वरले, कोणे,पालसई आदी गावांमध्ये नव्याने कंपन्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या कंपन्यांमध्ये वारंवार अपघात होऊन अनेक कामगार जायबंदी झाले तर अनेकजण मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रचंड होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.टायर कंपनीच्या प्रदूषणाने हैराण झालेल्या नागरिकांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश…
दीपक मोहिते, शिवसेनेच्या( एकनाथ शिंदे गट ) नूतन कार्यालयाचे उद्घाटन, वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनी पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.या निवडणुकीत त्यांचा पक्षाने तीस ते चाळीस जागा लढवण्याची तयारी चालवली आहे. जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.एकसंघ सेनेत फूट पडली,तेंव्हा निलेश तेंडूलकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी जिल्हा शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व यशस्वीपणे पार पाडली. आज त्यांच्या हस्ते निर्मळ नालासोपारा येथे पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंग…
वसंत भोईर,वाडा आंबा पीक पुरे,आता शेतकरी ड्रॅगन फ्रुट नाही तर स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळत आहेत. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्यामुळे आंबा पिकांचे उत्पादन घटत चालले आहे.त्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन फळांच्या लागवडीकडे आपले लक्ष वळवले आहे.स्ट्रॉबेरी,ड्रॅगन फ्रूट व मोसंबीची लागवड शेतकरी करू लागले आहेत. वाडा तालुक्यात पंधरा हजार पाचशे एकर क्षेत्रावर भात लागवड तर अठराशे हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येत असते. तालुक्यात सर्वाधिक लागवड आंबा पिकाची असून सुमारे सतराशे हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात येते.काजू – ५० हे.नारळ – १५ हे.चिकू – ३५ हे.अशी वर्गवारी आहे.ही पिके तालुक्यातील बागायतदाराना बऱ्यापैकी आर्थिक…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पहलगाम दहशतवादी हल्ला ; संवेदनशील प्रश्नाचा इव्हेन्ट होता कामा नये… काश्मीरच्या पहलगाम येथे घडलेल्या घटनेला आज आठ दिवस होत आले.पण आपल्या वृत्तवाहिन्यानी गेले आठ दिवस त्या घटनेचे पुराण २४ × ७ या न्यायाने दिवसरात्र चालवले.” पाकिस्तान घाबरला,त्यांचा लष्करप्रमुख बंकरमध्ये लपला,पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे कुटुंब परदेशात रवाना,पाक सैन्यात राजीनामा सत्र सुरू,सुमारे ४ हजार पाक सैनिकांनी युद्धाच्या भितीने राजीनामे दिले,पाकचे धाबे दणाणले,अशा आशयाच्या बातम्या दिवसभर चालवल्या.तर दुसरीकडे पाक सैन्याने अनेक भारतीय चौकीवर तुफान गोळीबार सुरू केला असून त्यास भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याच्या बातम्याही त्यांनी आपल्याला ऐकवल्या.या वृत्तवाहिन्यांनी पाकिस्तानने युद्धाचा धसका घेतल्याच्या बातम्यांचा अक्षरशः भडिमार केला.हा देखील एकप्रकारचा…
दीपक मोहिते, ” नियती खरंच श्रेष्ठ आहे, ” सहा वर्षांपूर्वी रंगलेला ” रात्रीचा खेळ चाले,” चा प्रयोग आजही नालासोपारावासियांच्या आठवणीत आहे, आजच्या दिवशी बरोबर सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री नालासोपारावासीय गाढ झोपेत असताना,शहराच्या मध्यवर्ती भागात काही राजकीय व्यक्ती वेगळ्याच कामात गुंतल्या होत्या.ही मंडळी त्यावेळी ” रात्रीचा खेळ चाले,” या अदभुत प्रयोगाला अंजाम देत होते.याचा सुगावा लागताच,सर्वत्र एकच गदारोळ उठला.त्यावेळी तेथे असलेल्या गाडीत नक्की काय आहे ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.सोशल मीडियावर क्षणार्धात या उपदव्यापाची व्हीडीओ क्लिप वायरल झाली व नक्की काय प्रकार सुरू होता,याचा मतदारांना उलगडा झाला. वसईच्या नसलेल्या गुंडगिरीवर भरभरून बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकसंघ सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात ” सेवा हक्क दिन,” उत्साहात साजरा, राज्यात सर्वत्र २८ एप्रिल हा दिवस “ सेवा हक्क दिन,” म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीची ” दशकपूर्ती,” आणि ” प्रथम सेवा हक्क दिन,” निमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली “ सेवा हक्क दिन,” आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “ सेवा हक्क शपथ,” घेतली तसेच सेवा हक्क दिन उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हा व तालुका पातळीवर विविध विशेष उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी…
सुगंध जोशी,बोरिवली, गोखले हायस्कूलच्या चैतन्य उन्हाळी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बोरिवली येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्क यांच्या सहकार्याने तीन दिवसीय चैतन्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या बौद्धिक मानसिक व शारीरिक व कलागुणांचा विकास अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून २८ ते ३० एप्रिल या तीन दिवसाच्या चैतन्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त योगासने,श्वसनतंत्र, बुद्धिबळ,हस्तकला व नृत्यकला यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ.सुहासिनी संत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,सध्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्यामुळे भयमुक्त व तणावविरहित…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपमध्ये भाटांची भाऊगर्दी… भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अधून मधून बऱ्यापैकी विनोद करत असतात.त्यांच्या या विनोदाला किती दर्जा असतो,हा वादाचा मुद्दा असला तरी त्यांचे हे गुऱ्हाळ अधून मधून चालुच असते.काल त्यांनी २०३४ पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील,अशी भविष्यवाणी करून टाकली.त्यांच्या या भाटगिरी करण्याच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी हे वक्तव्य केले आहे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता होऊ लागली आहे.गेल्या निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व पंकजा मुंडे यांना पावलोपावली डावलले होते. विधानसभा व विधान परिषदेच्या उमेदवारीपासून वंचित ठेवले होते,त्या फडणवीसांचा ” फडणवीस चालीसा,” पठण करण्यात बावनकुळे,नितेश राणे व नवनीत राणा,हे तिघे सतत आघाडीवर असतात.नितेश राणे यांनी…
सचिन परब,वसई शिवसेनेत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश, वसई,नालासोपारा विधानसभेतील अनेक राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या लाडक्या बहिणी पक्षात प्रवेश करीत आहेत असे सामाजिक कार्यकर्ता ट्रिझा परेरा यांनी सांगितले.यावेळी अनेक युवा व वरिष्ठ कार्यकर्त्यांनी प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असल्याचे सांगितले.या सर्व पक्षप्रवेशा वेळी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करताना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष असून आपल्या सर्वांच्या हातून लोकांची कामे होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड.अनिल चव्हाण,दिवाकर…
