सचिन परब,वसई
शिवसेनेत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश,
वसई,नालासोपारा विधानसभेतील अनेक राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या लाडक्या बहिणी पक्षात प्रवेश करीत आहेत असे सामाजिक कार्यकर्ता ट्रिझा परेरा यांनी सांगितले.यावेळी अनेक युवा व वरिष्ठ कार्यकर्त्यांनी प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असल्याचे सांगितले.या सर्व पक्षप्रवेशा वेळी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करताना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष असून आपल्या सर्वांच्या हातून लोकांची कामे होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड.अनिल चव्हाण,दिवाकर सिंग,उपतालुका प्रमुख संतोष जाधव,वसई तालुका अध्यक्ष व्यापारी आघाडी जिग्नेश मारू,तालुका समन्वयक सुशील द्विवेदी,शहर प्रमुख राजू पाटील,धर्मेंद्र जगताप,सह समन्वयक रवी मोंडकर,रमेश साळवी हे उपस्थित होते.

