सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्ह्यात ” सेवा हक्क दिन,” उत्साहात साजरा,
राज्यात सर्वत्र २८ एप्रिल हा दिवस “ सेवा हक्क दिन,” म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीची ” दशकपूर्ती,” आणि ” प्रथम सेवा हक्क दिन,” निमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली “ सेवा हक्क दिन,” आज उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “ सेवा हक्क शपथ,” घेतली तसेच सेवा हक्क दिन उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हा व तालुका पातळीवर विविध विशेष उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई,तहसिलदार सचिन भालेराव,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हसनाळकर, यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी व पालघर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रचालक उपस्थित होते.
आशागड ग्रामपंचायत ( डहाणू ),चहाडे ग्रामपंचायत ( पालघर ),पोमण ग्रामपंचायत ( वसई ), आमगाव ग्रामपंचायत (तलासरी),नेहरोली ग्रामपंचायत ( वाडा ),चिंचघर ग्रामपंचायत ( विक्रमगड ), खडखड ग्रामपंचायत ( जव्हार ),सतुर्ली ग्रामपंचायत ( मोखाडा ) या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केला.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार हून अधिक सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाईन दिल्या आहेत. अजून ३०० सेवा या ऑनलाईन प्रणालीमध्ये आणायच्या आहेत तर १२५ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत. म्हणून शासनाच्या सर्व विभागांना १५ ऑगस्टपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

