- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा बैलजोडीचा भाव लाखांत ; चारा महागला,ट्रॅक्टर परवडला, चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे,बैलजोडीची किंमत देखील लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणे,सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दिवसेंदिवस शेती करणे आता कठीण होत आहे.खते, बियाणे व औषधे यांचा खर्च गगनाला भिडला असतांना शेतीवर नफा मिळणे,कठीण झाले आहे.सालगड्याचे भाव एका वर्षासाठी दीड लाखांच्या घरात पोहोचले आहेत.एवढे पैसे मोजूनही जनावरांचे संगोपन करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यातच आता गेल्या काही वर्षात बैलांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसाधारण बैलजोडी दीड ते दीड लाख लाखाच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची विभागणी झाली असुन…
दिपक मोहिते, ” टीआरपीचा धिंगाणा,” भारतीय जनतेने गेल्या आठ दिवसात वृत्तवाहीन्याचा उन्माद अनुभवला…. गेल्या आठ दिवसात देशातील वृत्तवाहिन्यांना भारत व पाक या देशात झालेल्या युद्धामुळे बऱ्यापैकी खाद्य मिळाले होते.देशभरातील तमाम वृत्तवाहिन्यांनी सलग आठ दिवस आपल्या छोट्या पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला.दिवसरात्र केवळ युद्धाच्या घडामोडीनी लोकांच्या सहनशीलतेचा जणू अंतच पाहिला. टीआरपीच्या या जीवघेण्या स्पर्धेत जवळपास सर्वच वृत्तवाहिन्या आपले भान हरवून बसले होते.एकच बातमी,दर्शकांनी किती वेळा पहायची ? यावर केंद्र सरकारने आता नियंत्रण आणण्याची गरज आहे.अनेक वृत्तवाहिन्यांनी एकच बातमी दोनशे हुन अधिक वेळा दाखवण्याची जणू स्पर्धाच लावली होती.यावेळी अनेक वृत्तवाहिन्यांनी माजी लष्करी अधिकाऱ्यांना लष्कराचे विशेष तज्ञ म्हणून पाचारण केले होते.त्यातून नक्की काय…
नवीन पाटील,सफाळे सफाळ्यात बोगस आयएएस अधिकाऱ्याकडून कोट्यवधींचा जमीन घोटाळा, डेप्युटी कलेक्टर असल्याचा बनाव करीत खोटे दस्तावेज बनवून कोट्यावधींच्या जमिनींचा घोटाळा करणाऱ्या प्रतिक मोहन पाटील ( रा. मधुबन सोसायटी,सफाळे ) याला सफाळे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षा देवून त्यात उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर झाल्याचा बनाव रचला. प्रतिक पाटील हा सफाळे परिसरात राहत होता,सफाळे पोलिस स्टेशन हद्दीतील कर्दळपाडा भागात पालघर येथील जयंत विष्णू दांडेकर यांची १५ एकर आणि आशालता दत्तात्रय ताम्हणकर या मयत महिलेची साडेपाच गुंठे मालकीची जमीन आहे. या दोन्ही जमिनींसाठी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांच्या साहाय्याने प्रतीक पाटील यांनी खोटे दस्तावेज बनवले व ११…
दीपक मोहिते, भारताला नडला,त्याला लष्कराने फोडला, अखेर पाकने भारतासमोर गुडघे टेकले… भारतीय सैन्याने अवघ्या सहा दिवसात पाकिस्तान्याना गुडघे टेकायला लावले.पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांचे मोठे बंधू व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रातोरात दोन्ही देशा दरम्यान शस्त्रसंधी घडवून आणली.त्यामुळे पाकिस्तानची अब्रू राखली गेली.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या शस्त्र संधीसाठी साकडे घालण्यात आले.त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रोबियो यांनी वेगाने हालचाली केल्या व या शस्त्रसंधीला मूर्तस्वरूप दिले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २२ पर्यटकांची निर्घृण हत्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले व भारतीय वायू दलाने अवघ्या २५ मिनिटात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नाल्यातील कचरा नाल्याच्या बाजूला टाकण्यात येतो,या कृष्णकृत्यात फार मोठे अर्थकारण, दरवर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग १०० % नालेसफाई केल्याचा दावा करत असते.पण त्यांच्या या दाव्यात बिलकुल तथ्य नसते.या महानगरपालिकेची नालेसफाई ही चक्क करदात्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असते.ठेकेदार,मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी या तिघांचे खिसे भरण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असतो,असा आरोप नागरिक करत असतात. वसई विरार महानगरपालिका हद्दीत पावसाळी पाणी वाहून नेणारे असंख्य नाले आहेत.परंतु गेल्या काही वर्षात या नाल्याच्या परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे हे सर्व नाले अरुंद झाले आहेत.त्यामुळे दरवर्षी अतिवृष्टी झाली की हे सर्व नाले तुडुंब भरतात व पावसाळी पाणी शहरात साचून…
सचिन परब,वसई अवकाळी पावसामुळे वसई विजयोत्सव दिन उत्सवाच्या तारखेत बदल, वसई विरार शहर महानगरपालिकेने २८७ वा वसई विजयोत्सव दिन सोहळा १० ते १२ मे २०२५ असा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता.मात्र,मंगळ.६ ते ८ मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक परिसरामध्ये पाणी साचले, सोबत या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असलेला परिसरात चिखलाचे सम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच हवामान खात्याच्या सुचनेनुसार,पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने वसई विजयोत्सव कार्यक्रम तीन दिवसांच्या ऐवजी फक्त एक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोम.१२ मे २०२५ रोजी फक्त एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला…
दीपक मोहिते, ” फ्रँटलाइन,” पाकिस्तानने वेळीच शहाणे व्हावे,अन्यथा तीन तुकडे होण्याची शक्यता, भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले असून युद्धाची व्याप्ती सतत वाढत आहे.हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याची शक्यता आहे.या युद्धाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसणार आहे.गेल्या काही वर्षात या देशाची आर्थिक घडी पार विस्कळीत झाली आहे.औद्योगिक उत्पादन,व्यापार,जीडीपी,कृषी व रोजगार या क्षेत्रात पाकिस्तान जगाच्या क्रमवारीत १०९ क्रमांकावर घसरला आहे.वाढती महागाई व बेरोजगारी,यामुळे जनता अधूनमधून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते. देशाचे चारही प्रांत सिंध,पंजाब,पख्तुनख्वा व बलुचिस्तान,अशांत बनले आहेत.बलुचिस्तान व पख्तुनख्वा,हे दोन्ही प्रांत फुटून निघण्याच्या तयारीत आहेत.अशा स्थितीत हे युद्ध त्यांच्या…
जव्हार प्रतिनिधी, वाड्यात मशाल गौरव पुरस्काराचे वितरण, ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘मशाल’ या वृत्तपत्राच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमीत्त मशाल गौरव पुरस्कारांचे वितरण शरद नगर येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील,माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, खा.डॉ.हेमंत सवरा,सद्गुरु अलोकनाथ महाराज,उबाठाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामधे आदर्श लोकप्रतिनीधी खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,आदर्श संस्थाचालक शिल्पा शिंदे, आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कमा कामडी,आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरु आलोकनाथ महाराज,आदर्श फोटोग्राफर दिपक गोळे,उत्कृष्ट पत्रकार दिपक चंदे,आदर्श युवा उद्योजक प्रितम भोपतराव, आदर्श सामाजिक…
दीपक मोहिते, अखेर शहाणपण सुचलं.. चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करा- सर्वोच्च न्यायालय, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाची मुदत संपून तीन ते चार वर्षे पूर्ण होत आली पण या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याविषयी अंतिम सुनावणी झाली असता घटनापीठाचे प्रमुख न्या.सूर्य कांत यांनी येत्या चार आठवड्यात या निवडणुका करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले. तसेच ही निवडणूक प्रक्रिया चार महिन्यात संपवावी अशी सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना…
दीपक मोहिते, नेत्रदिपक कामगिरी, दि ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेला २१८ कोटी रु.चा नफा, सहकार क्षेत्रात अग्रेसर बँक आणि शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून प्रसिद्ध असलेली ठाणे आणि पालघरवासियांची बँक दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात २१८ कोटी ९७ लाख रु.चा नफा चालू आर्थिक वर्षात मिळवला आहे.राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेने दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ठाणे नेहमीच अग्रेसर राहिली आहे.बँकेने वर्षअखेर १ हजार ५९३ कोटी २५ लाख रु.चा निधी उभारला आहे. सद्यस्थितीत बँकेकडे ९ हजार ६३१ कोटी ४७ लाख रु.च्या ठेवी आहेत.यात बँकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५५९ कोटी ७३ लाख रु.ची वाढ झाली आहे.बँकेने ४…
